इशान किशन वैतागला! शेवटी घेतला मोठा निर्णय
(sports news) भारताचा स्फोटक फलंदाज इशान किशन गेल्या अनेक दिवसापासून चर्चेचा विषय बनला आहे. भारतीय संघ त्यांच्यावर खूप विश्वास ठेवत होता आणि त्याला बराच काळ आपल्यासोबत ठेवला होता. आयसीसी वर्ल्ड 2023 सारख्या मोठ्या टूर्नामेंटमध्येही तो खेळला होता. एकप्रकारे इशान किशनने संघात आपले स्थान पक्के केले होते, मात्र इशानच्या एका निर्णयाने त्याचे करिअर पणाला लावले आहे.
इशान किशनला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून आपले नाव मागे घेतले. त्यानंतर आता पुन्हा संघात स्थान मिळवण्यात त्याच्यासाठी कठीण झाले आहे. पण सगळ्या दरम्यान इशान किशनने मोठा निर्णय घेतला आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी इशान किशनने सांगितले होते की, तो बराच काळ संघाशी जोडलेला आहे, त्यामुळे तो मानसिकदृष्ट्या थकलेला आहे. आता विश्रांतीची गरज आहे. त्याने बीसीसीआयला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर न पाठवण्याची विनंती केली.
अशा परिस्थितीत बीसीसीआयने त्याचा निर्णय मान्य केला, पण यानंतर संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला एवढी मेहनत करावी लागेल याची कल्पनाही त्याने केली नसेल. दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर अफगाणिस्तानविरुद्ध 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळवण्यात आली, मात्र या मालिकेत इशानला संधी मिळाली नाही.
यानंतर इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली, परंतु या मालिकेतही इशानला संघात स्थान मिळवता आले नाही. यावेळी राहुल द्रविडला विचारण्यात आले की तो इशान किशनला संघात कधी आणणार?
यावर भारतीय संघाचे कोच म्हणाले होते की, इशानने संघात स्थान मिळवण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळून सराव केला पाहिजे, तरच फलंदाज चांगली कामगिरी पाहून पुनरागमन करेल. डोमेस्टिकमध्ये चांगली कामगिरी केल्यास संघात स्थान मिळेल, असे प्रशिक्षकाने स्पष्टपणे सांगितले. (sports news)
भारतीय कोचने सांगितले तरी इशान किशन देशांतर्गत क्रिकेट खेळला नाही आणि सुट्टीचा आनंद घेत राहिला. इशान चांगल्या फॉर्ममध्ये असूनही त्याला संघात का बोलावले जात नाही, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.
शेवटी जेव्हा त्याला संघात स्थान मिळवता आले नाही, तेव्हा त्याने मोठा निर्णय घेतला आणि सराव सुरू केला. इशान किशनने बडोद्यातील रिलायन्स स्टेडियममध्ये भारतीय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्यासोबत सराव सुरू केला आहे.
इंग्लंड विरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेतील 2 सामने खेळले गेले आहेत. मालिकेत अजून तीन सामने बाकी आहेत. अशा स्थितीत इशान किशन शेवटच्या 3 सामन्यांमध्ये पुनरागमन करतो की नाही हे पाहणे बाकी आहे.
9 फेब्रुवारीपासून झारखंड आणि हरियाणा यांच्यात रणजी ट्रॉफी खेळली जात आहे, परंतु इशान किशन रणजी खेळण्याच्या मूडमध्ये दिसत नाही. अशा परिस्थितीत इशानच्या पुनरागमनावर अजूनही सस्पेन्स कायम आहे.