कोलकाता नाईट रायडर्ससाठी वाजवली धोक्याची घंटा
(sports news) आयपीएल 2024 सुरू होण्याच्या एक आठवड्याआधी कोलकाता नाईट रायडर्ससाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. कोलकाताला कर्णधार श्रेयस अय्यरच्या रूपाने मोठा धक्का बसू शकतो.
आजकाल अय्यर रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना मुंबईकडून विदर्भाविरुद्ध खेळत आहे. विजेतेपदाच्या सामन्यात अय्यरने दुसऱ्या डावात मुंबईसाठी शानदार फलंदाजी केली आणि १० चौकार आणि ३ षटकारांसह ९५ धावा केल्या, पण इथूनच त्याच्या अडचणींना सुरुवात झाली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दुसऱ्या डावात फलंदाजी केल्यानंतर अय्यरची जुनी दुखापत पुन्हा एकदा उद्भवली. आता आयपीएल सुरू होण्यासाठी थोडाच अवधी शिल्लक आहे, अय्यरच्या दुखापतीमुळे कोलकाता नाईट रायडर्सची चिंता वाढली आहे. दुखापतीमुळे अय्यरला गेल्या हंगामात ही मुकावे लागले होते आणि आता या वेळी पुन्हा तो पहिल्या काही सामन्यांना मुकणार हे निश्चित दिसत आहे. रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्याच्या शेवटच्या म्हणजे पाचव्या दिवशी अय्यर मैदानावर क्वचितच दिसणार आहे.
अहवालात पुढे म्हटले आहे की, रणजी फायनलच्या चौथ्या दिवशी अय्यर मैदान सोडून स्कॅनसाठी रुग्णालयात गेला होतो. या डावात त्याला दोनदा पाठदुखीचा त्रासही झाला होतो, ज्यावर मुंबईच्या फिजिओने उपचार केले. अय्यरची ही तीच जुनी दुखापत आहे, ज्यासाठी गेल्या वर्षी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. (sports news)
याशिवाय, सूत्राने असेही सांगितले की, इंग्लंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेदरम्यान अय्यरने दुखापतीची तक्रार केली होती. मात्र, अय्यरच्या दुखापतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आता अय्यर सुरुवातीपासूनच आयपीएलमध्ये खेळू शकतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.