सकाळ-संध्याकाळ दूधात मिसळून प्या या वस्तू , महिन्यात चष्म्याचा नंबर होईल कमी
हल्लीच्या जमान्यात डोळ्यांचे आरोग्य जपायला लोकांना वेळ मिळत नाही. त्यामुळे कमी वयात नजर कमजोर होण्यासारखे प्रकार घडत आहेत. वारंवार मोबाईल स्क्रीन पाहून डोळ्यांवर ताण येत आहे. त्यामुळे नजरेचा चष्मा चाळीच्या आधीच लागत आहे. त्यामुळे आपली नजर तीक्ष्ण आणि चांगली करायची असेल तर आपल्या हातात एक पर्याय आहे. दूधात (milk) घरातील काही जिन्नस मिक्स करुन आपल्या डोळ्यांचे आरोग्य आपण सुधारु शकतो. त्यामुळे आज आपण किचनमधील वस्तूंद्वारे घरच्या घरी डोळ्यांचे आरोग्य कसे सुधारायचे ते पाहूयात…
केसर
केसरमध्ये एंटीऑक्सिडेंट्स आणि जीवनावश्यक घटक असतात. त्यामुळे एक ग्लासात दूधात केसर टाकून रोज प्यायल्यास चांगला गूण येईल आणि आपला चष्मा लवकरच दूर होईल किंवा चष्म्याचा नंबर जास्त असेल तर कमी होण्यासाठी मदत मिळेल.
बदाम
बदामात विटामिन्स ई भरपूर असते. जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूपच लाभदायक आहे. बदाम रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी त्यांची पेस्ट बनवून दूधात टाकून ते दूध प्यावे. डोळ्याची नजर सुधारण्यास मदत मिळेल. बदामामुळे तुमची त्वचा देखील तुकतुकीत होऊन तुम्ही तरुण दिसू लागाल.
गाजर
गाजरात विटामिन्स ए आणि बिटा कॅरोटीन असते. ज्यामुळे डोळ्याचे आरोग्य सुधारते. गाजराचा रस काढून तो दूधातून प्यावा खूपच लाभदायक ठरेल. दूधात गाजराचा रस मिक्स करुन पिल्याने खूपच फायदा होतो.
मध
मधात एण्टी इंफ्लेमेटरी आणि एंटीऑक्साडेंटचे गुण आहेत. एक चमचा मध दूधात (milk) टाकून प्यायल्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारते. मधामुळे तुम्हाला इतरही लाभ मिळतात.
तुळस
तुळशीचे पाने कमजोर नजर सुधारण्यासाठी लाभदायक आहेत. काही तुळशीची पाने दूधात उकळून ते दूध गरमागरम प्यावे.