डी.के.टी.ई. आय.टी.आय. च्या ४३ विद्यार्थ्यांची टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स लिमिटेड] पुणे या नामांकित कंपनीमध्ये निवड

 

इचलकरंजी  डि.के.टी ई. सोसायटीच्या पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील आय.टी.आय. मध्ये अंतिम वर्षात प्रशिक्षण घेत असलेल्या इलेक्ट्रिशियन ट्रेड मधील १७ प्रशिक्षणार्थींची, फिटर ट्रेड मधील १३ प्रशिक्षणार्थींची व वेल्डर ट्रेड मधील १३ प्रशिक्षणार्थींची अशा एकूण ४३ प्रशिक्षणार्थींची टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स लिमिटेड पुणे येथील नामांकित कंपनीमध्ये अप्रेंटीशीप या पदाकरिता निवड झाली आहे.

टाटा मोटर्स ही फक्त भारतामधील नव्हे तर जागतिक वाहन निर्मिती क्षेत्रातील नामांकित कंपनी आहे ही कंपनी जगाला कार, ट्रक, बसेस, स्पोर्ट्स वाहने, संरक्षक वाहने पुरवतात.

या विद्यार्थ्यांची झालेली निवड म्हणजे औद्योगिक प्रशिक्षणातील गुणवत्ता व दर्जा यांचा परिपाक आहे.

या निवड झालेल्या विद्यार्थ्यांना डि.के.टी ई. सोसायटीचे अध्यक्ष मा. श्री. कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा), उपाध्यक्ष विद्यमान आमदार आदरणीय मा. श्री. प्रकाश आवाडे (आण्णा), मानद सचिवा मा. डॉ. सौ. सपना आवाडे (वहिनी) व सर्व संचालक मंडळाचे बहुमोल सहकार्य लाभले आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांना यशवंतराव चव्हाण पॉलीटेक्निकचे प्राचार्य श्री. ए. पी. कोथळी तसेच आय.टी.आय. चे प्राचार्य श्री. डी. डी. पाटील व टी.पी.ओ.  श्री. आर. आर. मगदूम तसेच सर्व आय.टी.आय. स्टाफ यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे.

विद्यार्थ्यांच्या या निवडीबद्दल समाजाच्या सर्व स्तरावरून अभिनंदन याचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *