भारताला सहावा झटका, आर अश्विन बाद

सेंच्युरियन कसोटीचा(Test) दुसरा दिवस पावसामुळे वाहून गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी (The good news)आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. येथे सकाळपासून ढग स्वच्छ आहेत आणि खेळ वेळेवर सुरू झाला आहे. आता टीम इंडियाची नजर पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारण्यावर आहे. टीम इंडियाची धावसंख्या ९६.४ षटकांत ५ बाद २९१ आहे

के एल राहुलनंतर अजिंक्य रहाणेही पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. लुंगी एनगिडीच्या चेंडूवर यष्टिरक्षक क्विंटन डी कॉकने त्याचा झेल पकडला. रहाणेचे अर्धशतक अवघ्या दोन धावांनी हुकले. त्याने १०२ चेंडूत ४८ धावा केल्या. एनगिडीची ही सामन्यातील चौथी विकेट आहे.

भारताची चौथी विकेट पडली आहे. लोकेश राहुल १२३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. कागिसो रबाडाने त्याची विकेट घेतली तर विकेटच्या मागे क्विंटन डीकॉकने त्याचा झेलबाद पकडला. रबाडाच्या शॉर्ट बॉलवर राहुलने पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या ग्लोव्हज स्पर्शकरून विकेटच्या मागे गेला. यष्टीरक्षक डीकॉकने कसही चूक न करता झेल पकडला

कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द झाला. सेंच्युरियन येथे सोमवारी (दि. २७) दिवसभर पाऊस पडला, त्यामुळे एकही षटक टाकले गेले नाही आणि पंचांनी त्या दिवसाचा खेळ रद्द केला. दुसऱ्या दिवसाची उणीव भरून काढण्यासाठी तिसऱ्या दिवशी एकूण ९८ षटकांचा खेळ होईल अशी माहिती मिळत आहे.

तत्पूर्वी, सामन्याच्या पहिल्या दिवशी (रविवार दि. २६) भारतीय संघाने ३ गड्यांच्या मोबदल्यात २७२ धावा केल्या. सलामीवीर केएल राहुल नाबाद १२२ आणि अजिंक्य रहाणे ४० धावांवर खेळत होते. पहिल्या दिवसाअखेर दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी दोघांमध्ये ७३ धावांची भागीदारी झाली होती.

आज (दि. २८) सामन्याच्या तिसऱ्या दिवशी अजिंक्य रहाणेकडून शतकाची अपेक्षा असेल. रहाणे बऱ्याच दिवसांपासून फलंदाजीत चमक दाखवू शकलेला नाही. मागच्या वर्षी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतकी खेळी केली होती. त्यानंतर त्याला गेल्या वर्षभर मोठी धावसंख्या करता आली नाही. दरम्या, द. आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्येही समावेश होणार की नाही यावर मतमतांतरे होती. अनेकांचे म्हणणे होते की त्याच्या ऐवजी श्रेयस अय्यरला संघात संधी द्यावी. परंतु कर्णधार विराट कोहली आणि संघ व्यवस्थापनाने रहाणेवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आणि सेंच्युरियन कसोटी सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले. दुसरीकडे त्याच्या या निवडीने क्रिकेट चाहते नाराज झाले. ट्विटरवर त्याच्याविरोधात ट्रेंडही आला होता. पण, सामन्याच्या पहिल्या दिवशी रहाणेने शानदार फलंदाजी करत ८१ चेंडूत नाबाद ४० धावा केल्या. दुस-या दिवशीचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला होता. आज सामन्याच्या तिस-या दिवशी रहाणे अर्धशतक आणि त्यानंतर शतक झळकावेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (INDvsSA Test Day 3)

रहाणेचे शेवटचे कसोटी शतक २२ डावांपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न येथे झाले होते. आज (दि. २८) जर रहाणे शतक झळकावण्यात यशस्वी ठरला तर हे त्याचे कारकिर्दीतील तेरावे शतक असेल तर द. आफ्रिकेविरुद्धचे चौथे शतक असेल. या वर्षी रहाणेने आतापर्यंत २१.४८ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. टीकाकारांची तोंडे बंद करण्याची आजच्या दिवशी त्यांच्याकडे उत्तम संधी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *