विराटसोबत अनुष्का दिसल्याने कोणाचा झाला संताप

क्रिकेट कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना खेळणाऱ्या विराट कोहली याच्यासाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा. भारतीय क्रिकेट संघाला एका वेगळ्या आणि प्रशंसनीय उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या विराटला ‘बॅटिंग सुपरस्टार’ असा किताब त्याला दिला गेला. (Virat Kohli Anushka sharma )
विराटसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा या क्षणी त्याची पत्नी, अनुष्का शर्मा हिसुद्धा उपस्थित होती.
पण, अनुष्काची त्याला मिळालेली ही साथ अनेकांनाच खटकली. सोशल मीडियावर बऱ्याचजणांनी व्यक्त होत याबाबतची नाराजी शब्दांत आणि ट्विटच्या रुपात मांडली. क्रिकेट लाईव्ह इवेंटमध्ये अनुष्काचं ऑनफिल्ड येणं काहींना रुचलं नाही, ज्यामुळे तिला परवानगी मिळालीच कशी, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला.
विराटला मात्र याची कशाचीत तमा नव्हती. पत्नीची या क्षणी असणारी साथ त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाची होती. मनोगत व्यक्त करताना त्यानं या आनंद बोलूनही दाखवला. तिथे अनुष्काची खिल्ली उडवणारा एक वर्ग आणि अनुष्काची पाठराखण करणारा एक वर्ग, अशा दोन्ही गटांमध्ये सोशल मीडियावर जुंपली. कोणी काहीही बोललं तरीही विराट आणि अनुष्कानं कायमच या नात्यात एकमेकांची साथ दिली आहे. कारकिर्द आणि वैयक्तिक आयुष्यात येणाऱ्या प्रत्येत चढ उताराचा सामना या जोडीनं केला आहे हे मात्र नाकारता येणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *