‘हे सरकार दाऊदच्या इशाऱ्यावर चालते का ?

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. आझाद मैदानात भाजप नेत्यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी ठाकरे सरकारवर हल्ला चढवला.
तेव्हा राज्यपालांनी लोकशाहीचा गळा घोटला नाही का ? गिरीश महाजनांना उच्च न्यायालयाचा झटका
नवाब मलिकांचा राजीनामा घेईपर्यंत शांत बसणार नसल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार आशीष शेलार, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार, मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनीही नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी ठाकरे सरकारला घेरले
नवाब मलिकांच्या राजीनामा घेईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिला. हे सरकार दाऊदच्या इशाऱ्यावर चालते का ? अशी विचारणा त्यांनी केली. २५ रुपये चौरस फुटाने जागा घेतल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. नवाब मलिक जोवर राजीनामा घेणार नाहीत, तोवर संघर्ष तीव्र करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नवाब मलिकांच्या राजीनाम्याच्या निमित्ताने यावेळी भाजपने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला.
महाराष्ट्रात २७ महिन्यात संजय राठोडांचा राजीनामा घेतला यात कोणताही गुन्हा दाखल झाला नाही, अनिल देशमुखांवर ईडीने कारवाई केली यांचा राजीनामा घेतला. तसेच मलिकांवर कारवाई झाली त्यांचा राजीनामा मंजूर होणार होता, त्यांची जागा घेण्यासाठी नेता तयार होता, पण त्यांचा राजीनामा अचानक थांबला त्यांचा राजीनामा दाऊदमुळे थांबला. यासाठी आपण रस्त्यावर आलो आहोत, हे सरकार दाऊदच्या पाठींब्यावर चालत आहे. या सरकारला शेतकऱ्यांची पडलेली नाही त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करावा, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलल यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *