उद्धव आणि राज ठाकरेंच्या शिक्षिकेचं निधन

दादर इथल्या बालमोहन विद्यामंदिरात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यासह अनेक राजकारण्यांना शिकवणाऱ्या शिक्षिका सुमन लक्ष्मण रणदिवे यांचं रविवारी रात्री निधन झालं. वसईतील वृद्धाश्रमात वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सुमन रणदिवे या 1991 मध्ये निवृत्ती होईपर्यंत बालमोहन विद्यामंदिर इथं प्राथमिक शाळेतील मुलांना गणित आणि विज्ञान विषय शिकवत होत्या.

वसई पश्चिमेच्या गावात एका जोडप्या द्वारे चालविणाऱ्या जाणाऱ्या ‘न्यु लाईफ फाउंडेशन’ या आश्रमात त्या गेल्या अनेक वर्षांपासून रहात होत्या.
गेल्या वर्षी तौक्ते वादळात झालेल्या आश्रमाच्या नुकसनीनंतर त्या प्रकाशज्योतात आल्या होत्या.

वादळात झालेल्या आश्रमाचे नुकसानाची माध्यमांनी परिस्थिती सांगितल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून आश्रमाला मदतीचा ओघ सुरू केला होता. राज ठाकरे यांनी तेव्हा फोनवरून त्यांची विचारपूसही केली होती.

गेल्या काही दिवसांपासून त्या काही आजारी होत्या. त्यांची तब्येत अधिकच बिघडत असल्याने डॉक्टरांना बोलाविण्यात आलं मात्र ते येण्यापूर्वीच रणदिवे यांनी रविवारी रात्री ८.३० वाजता अखेरचा श्वास घेतला.

रणदिवे यांच्या इच्छेनुसार त्यांच्या पार्थिवावर आश्रम चालविणाऱ्यांकडून अंत्यसंस्कार करण्यात आले असून त्यांच्या कुटुंबियांना याबाबत माहिती दिली असल्याचे न्यू लाईफ फाऊंडेशनच्या मालक सरिता मोरे यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *