दहावीचा पेपर सुरू होण्यापूर्वीच खळबळ उडवून देणारी बातमी

आजपासून राज्यभरात दहावीची परीक्षा (exam) सुरू होत असतानाच,एक दिवस आधी ( सोमवारी ) औरंगाबाद शहरातील एका संस्थाचालकाला दहावीच्या विद्यार्थ्यास हॉल तिकीट आणि परीक्षेत मदत करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच घेताना शाळेतच रंगेहाथ पकडण्यात आले आहे. विद्यार्थ्याने केलेल्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली असून या घटनेनंतर शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.

शहरातील कलावतीदेवी चॅरिटेबल ट्रस्टचा अध्यक्ष संपत पाराजी जवळकर (६४) याने दहावीच्या परीक्षेसाठी (exam) हॉलतिकीट आणि पेपरला मदत करण्यासाठी विद्यार्थ्याकडे ३० हजार रुपयांची लाच मागितली होती. तर शेवटी तडजोडीअंती १५ हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने विद्यार्थी व पालकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पथकाने सापळा लावला ज्यात १० हजारांचा पहिला हप्ता घेताना जवळकर यांना पथकाने रंगेहाथ पकडले. त्याच वेळी लिपिक सविता खामगावकरला ही ताब्यात घेतले.

अशी झाली कारवाई…..

जवळकर याने दहा हजार रुपये घेण्याचे मान्य केले. त्यानुसार एसीबीच्या पथकाने सापळा लावला. तर गारखेड्यात एक ठिकाणी पैसे देण्याचे ठरलं. त्यामुळे ठरल्याप्रमाणे सोमवारी दुपारी तक्रारदार यांनी जवळकरला १० हजार रुपये दिले. तक्रारदारांनी इशारा करताच जवळकरला रंगेहाथ पकडण्यात आले. सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, पोलीस उपअधीक्षक मारुती पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिपाली निकम, पोलीस कर्मचारी सुनील पाटील, बाळासाहेब राठोड, सी. एन. बागुल यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *