गौण खनिजच्या प्रश्नासंदर्भात राज्यमंत्री यड्रावकर यांची पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सोबत सकारात्मक चर्चा

जयसिंगपूर/प्रतिनिधी – रोहित जाधव

हरित लवादाकडील निर्देशानुसार सध्या गौण खनिज उत्खनन व वाहतूक यावर बंधने आलेली आहेत, हरित लवादाने काही प्रकरणांमध्ये पर्यावरण परवानगी बाबत निर्णय देतांना सरसकट सर्वच दगडी खाणी व क्रशर यांच्याबाबत पर्यावरण परवानगी आवश्यक असल्याचा निर्णय दिला आहे.यामुळे स्थानिक जिल्हाधिकारी व त्यांचे अधिनस्थ यंत्रणा महसूल विभागाने दगडखाणी व स्टोन क्रशर बंद करून कारवाया सुरू केल्या आहेत.यामुळे शिरोळ तालुक्यासह कोल्हापूर जिल्हा व अन्य ठिकाणी वडार समाज व इतर मजूर संस्थांच्या वतीने केल्या जाणाऱ्या या व्यवसाया समोर मोठे संकट निर्माण झाले असून,हजारो मजूर आणि त्यांच्या कुटुंबीयां समोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

तसेच शासकीय निधीतून होणारी सर्व मूलभूत सुविधांची कामे त्याचबरोबर बांधकाम क्षेत्रातील सर्व प्रकारची कामे ठप्प झाली आहेत.यावर मार्ग काढण्यासाठी वडार समाजाच्या प्रतिनिधींनी तसेच मजूर व व्यवसायिक संघटनांनी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील यांची भेट घेऊन निवेदने दीले होते.व या प्रश्नावर तोडगा काढण्यात संदर्भात विनंती केली होती.

यांची दखल घेऊन राज्यमंत्री यड्रावकर यांनी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन गौण खनिज च्या प्रश्नासंदर्भात तोडगा काढण्यासंदर्भात चर्चा केली होती.त्याचाच भाग म्हणून मंगळवारी पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे यांनी या प्रश्नासंदर्भात विधानभवन येथे बैठक घेतली त्या बैठकीस राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना सुद्धा आमंत्रित करण्यात आले होते.गौण खनिज व्यवसायासमोर निर्माण झालेल्या या प्रश्नांमुळे सर्वसामान्य मजूर व या क्षेत्रातील व्यवसायिक यांच्या अडचणी बाबत राज्यमंत्री यड्रावकर यांनी बैठकीत विस्तृत माहिती दिली.

आणि या प्रश्नावर तातडीने मार्ग काढताना हे व्यवसाय सुरू करण्यासंदर्भात कार्यवाही व्हावी अशी मागणी केली, या बैठकीत पर्यावरण मंत्री नामदार आदित्य ठाकरे यांनी सकारात्मक चर्चा केली आणि तातडीने मार्ग काढण्यासाठी पर्यावरण व महसूल सचिव यांना निर्देश दिले, हरित लवादाने दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने आता पर्यावरण विभाग व महसूल विभाग यांच्या समन्वयाने हा प्रश्न निकाली निघणार आहे

या बैठकीस आमदार प्रकाश अबिटकर,श्रीमती मनीषा म्हैसकर प्रधान सचिव पर्यावरण,नितिन करीर अपर मुख्य सचिव महसूल,गडखाण व क्रशर संघटनेचे प्रतिनिधी संजय सावंत,जितेंद्र पाटील,अभिजित पवार,अबूबकर डांगे जयसिंगपूर,विक्रम पाटील,मोहन पाटील कोल्हापूर हून उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *