महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस विमुक्त जाती भटक्या जमाती मागासवर्गीय सेलच्या वतीने शरदचंद्रजी पवार यांना विविध मागण्यांचे निवेदन

कोल्हापूर/प्रतिनीधी – रोहित जाधव

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस विमुक्त जाती भटक्या जमाती मागासवर्गीय सेलच्या वतीने देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले व मुंबई येथे 25 एप्रिल रोजी मेळावा घेण्यात येणार आहे.

मंगळवार रोजी बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेस विमुक्त जाती भटक्या जमाती सेलचे प्रदेशाध्यक्ष हिरालाल राठोड साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने देशाचे नेते पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब यांची भेट घेऊन विमुक्त जाती व भटक्या समाजातील अडीअडचणी बाबत चर्चा करून सोडविण्यासाठी विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले व राज्यस्तरीय मेळावा 25 एप्रिल 2022 रोजी मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सभागृह येथे घेण्याचे ठरले आहे.

यावेळी सोलापूर शहर कार्याध्यक्ष मोहम्मद इंडीकर,राष्ट्रवादी काँग्रेस VJNT सोलापूर शहर उपाध्यक्ष व नाथ संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रेवणनाथ चव्हाण. नाथ संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष लोकसभा अध्यक्ष लक्ष्‍मण भोसले,पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष माने ताई,महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नाथ संघटना संजय बामणे व राज्यातील विविध जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *