‘२४ तासांत निर्णय घ्या’, चंद्रकांत पाटलांची काँग्रेसला ऑफर,

कोल्हापूर पोटनिवडणुकांच्या (Kolhapur North Assembly By Election) पार्श्वभूमिवर भाजप आणि काँग्रेसमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतं. एकीकडे कोल्हापूरची पोटनिवडणूक भाजपने लादल्याचा आरोप पालकमंत्री सतेज पाटील (Guardian Minister Satej Patil) यांनी केला तर दुसरीकडे काँग्रेसकडून निवडणूक लादण्यात आल्याचा आरोप चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला आहे. अशात त्यांनी काँग्रेसला एक मोठी ऑफर दिली आहे.

महेंद्र सिंह धोनीने CSKच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला; हा स्टार खेळाडू झाला नाव कर्णधार
कोल्हापूर पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसकडून जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण अजूनही २४ तास शिल्लक आहेत. जयश्री जाधव या भाजपच्या होत्या त्यांना परत भाजपमध्ये पाठवा. मी एबी फॉर्म बदलतो आणि ही निवडणूक बिनविरोध करतो, अशी थेट ऑफर चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
खरंतर, भाजपमध्ये परत यावं आणि निवडणूक लढवावी अशी विनंती चंद्रकांत पाटील यांनी जयश्री जाधव यांना केली होती. पण पती चंद्रकांत जाधव यांनी जो झेंडा हाती घेतला होता, त्याच पक्षातून आपण लढणार असल्याचं जयश्री यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे भाजपनेही आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे.
दरम्यान, ही निवडणूक बंटी पाटील यांच्या अहंकारापायी लादली गेली आहे. ज्या काही निवडणूका येतील त्या मला द्या, असा त्यांचा स्वभाव आहे. गोकुळ निवडणूक, जिल्हा बँक निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक सर्व निवडणूका मला द्या, अशा त्यांच्या स्वभावाने ही निवडणूक लादली गेली, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूर निवडणुक लढवण्याबाबत विचारलं असता त्यांनी, आता तर फक्त सत्यजित कदम लढत आहेत आणि ते विजयी होणारच आहेत. केव्हा तरी मी कसा लढतो हे पाहण्यासाठी एकानं राजीनामा देऊन दाखवा, असं थेट आव्हान त्यांनी दिलं आहे. तसंच, ज्या बंटी पाटलांनी शेत पाइपलाइनचं पाणी नाही आलं तर निवडणूक लढवणार नाही असं म्हटलं होतं त्याचं काय झालं, असा सवालही त्यांनी केला. त्यामुळं ही निवडणूक ५० वर्ष काँग्रेसची व ५ वर्ष भाजपची अशी लढवणार आहोत. आम्ही ५ वर्षात काय केलं हे मांडतो तुम्ही ५० वर्षात काय केलं ते सांगा, असंही ते म्हणाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *