राजेश टोपेंनंतर आता राजू शेट्टींनी घेतली जलील यांची भेट

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ( raju shetty meets imtiaz jaleel ) एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. यावेळी जलील यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला युतीचा प्रस्ताव दिला होता. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जलील यांची भेट घेतली आहे. औरंगाबादमध्ये जलील यांच्या निवासस्थानी ही भेट झाली.
राजू शेट्टी शुक्रवारी औरंगाबाद दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी इम्तियाज जलील यांच्या निवासस्थानी भेट देऊन जलील यांची भेट घेतली. नुकतेच जलील यांच्या आईचे निधन झाले होते. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी जलील यांची भेट घेऊन सांत्वन केले. तर यावेळी जलील आणि राजू शेट्टी यांच्यात राजकीय चर्चाही झाली असल्याचे बोलले जात आहे.
औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील बारामती ऍग्रो साखर कारखान्यावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व किसान पंचायत संघटना यांच्या वतीने धरणे आंदोलन सुरू आहे. दरम्यान औरंगाबाद दौऱ्यावर असलेल्या शेट्टी यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. तसेच यावेळी कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक यांच्यासोबत बैठक ळी घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *