राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सोमय्यांना काळ झेंडे दाखवत निषेध

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांचा दापोलीतील मुरुडमध्ये असणाऱ्या रिसॉर्टचा विषय पुन्हा चर्चेत आलं. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आज आपण अनिल परबांचा रिसॉर्ट पाडण्यासाठी जाणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आज सोमय्या सव्वा सात वाजेच्या सुमारास मुंबईतील (Mumbai) आपल्या घरापासून दापोलीला निघाले आहेत. यावेळी त्यांच्या सोबत कार्यकर्त्यांची गर्दी होती. सोमय्या यांच्या दापोली (Dapoli) दौऱ्यात अनेक ठिकाणी भाजप कार्यकर्ते त्यांचं स्वागत करत त्यांच्या या दौऱ्यात सामील होणार असल्याची माहिती भाजप कार्यकर्त्यांनी दिली आहे. त्यामुळे आज या विषयाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.
रत्नागिरितील खेड येथे भाजप नेते किरीट सोमय्या यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दखवत निषेध करण्यात आला आहे. यावेळी कार्यकर्त्यांकडून सोमय्या यांच्या विरोधात घोषणाबाजीदेखील करण्यात आली. दरम्यान, सोमय्या यांचा डाव हाणून पाडणार असल्याचा निर्धार शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.निलेश राणे यांना देखील दापोली पोलिसांकडून 149 ची नोटीस देण्यात आली असून, अशा नोटीसींना घाबरत नसल्याचे निलेश राणे यांनी म्हटले आहेत.
किरीट सोमय्या यांनी पोलिसांची नोटीस स्वीकारली नाही. त्यानंतर ते कशेडी घाटातून पुढे निघाले आहेत.
उद्धव ठाकरेंचे पोलीस उद्धट आहेत असं म्हणत सोमय्यांनी पोलिसांनी रोखल्याचा निषेध केला. कशेडी घाटात सोमय्यांना पोलिसांनी रोखलं. यावेळी त्यांची पोलिसांशी बाचाबाची देखील झाली. तसंच पोलिसांकडून त्यांना जी नोटीस देण्यात येत होती, ती स्विकारण्यास सोमय्यांनी नकार दिला आहे.
किरीट सोमय्या दापोलीत पोहोचण्यापूर्वीच पोलिसांचा मोठा फौजफाटा त्याठिकाणी तैनात करण्यात आला आहे. स्वत: पोलीस आयुक्त या ठिकाणी उपस्थित असून, सोमय्यांना रिसॉर्टकडे जाण्यापूर्वीच पोलीस रोखतील अशी शक्यता आहे.

सोमय्यांचं कार्यकर्त्यांकडून स्वागत
किरीट सोमय्या दापोलीकडे जात असताना रस्त्यात अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं. सध्या त्यांनी अर्ध्यापेक्षा जास्त रस्त पार केला असून, लवकरच ते दापोलीत पोहचणार आहे.

“दापोली पोलीस स्थानकात पोलीस अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक”
दापोलीत पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठका होत असून, अधीक्षक स्तरावरील अधिकाऱ्यांचा या बैठकीत समावेश आहे. यामुळे सोमय्यांना या ठिकाणी आडवणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसंच सोमय्यांसोबत असलेल्या कार्यकर्त्यांच्या वाहनांच्या गर्दी तसंत सेनेच्या कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून पोलिसांची बैठक सुरु असल्याची शक्यता आहे.

“नार्वेकरांनी बंगला पाडला मग परब का रिसॉर्ट पाडत नाही?”
अनिल परबांनी रिसॉर्ट बांधला, तो सीआरझेडमध्ये आहे. २५ कोटींची ही मालमत्ता आहे, मात्र अजूनही ती शेतजमीन दाखवण्यात आली आहे. नार्वेकरांनी बंगला बांधला होता, तो त्यांनी पाडला, मग परब का पा़डत नाहीत असा सवाल अनिल परबांनी केला.

“हा हातोडा साडे बारा कोटी जनतेचा”
दापोलीकडे निघाल्यानंतर सोमय्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, भाजप नेते उद्धव ठाकरे म्हणतात अनधिकृत बांधकाम करणार, हे काय मुख्यमंत्री आहेत? असा सवाल करत त्यांनी जनता असाच हातोडा घेऊन यांना बाहेर घालवणार असं म्हटलं. तसंच आपल्या हातातील हा हातोडा साडे बारा कोटी जनतेचा हातोडा आहे, जनतेचा हा हातोडा आहे सत्यासाठी हा आग्रह आहे, हे अनधिकृत बांधकामं तोडावं लागणार आहे असं सोमय्या म्हणाले.

सोमय्या म्हणाले, परबांचे दोन रिसाॅर्ट आहेत. एकावरच कारवाई झाली, मात्र दुसऱ्यावर का नाही? ठाकरे पोलिसांना नाचवतात, मात्र त्यांनी विसरु नये की, हे पोलीस जनतेचे आहेत. हा प्रतिकात्मक हातोडा जनतेच्या भावनेचं प्रतिक आहे. हिंसत असेल तर मला अटक करुन दाखवा असं आवाहन त्यांनी केलं. उद्धव ठाकरेंचं चाललं असतं तर माझे हात पाय कधीच तोडले असते, मात्र मला सुरक्षा आहे म्हणून वाचलो असा दावा सोमय्यांनी केला. पुढे ते म्हणाले, मी पुरावे दिलेत, आणि म्हणतात मला जेलमध्ये टाकू. चोरी लबाडी पकडली तर हे असं वागणार हे चालू देणार नाही. नवाब मलिक गेलेत, तसंच डर्टी सरकारच्या डझनभर मंत्र्यांवर देखील कारवाई होणार असं सोमय्यांनी सांगितलं.

सेना राष्ट्रवादी विरोध करणार
किरीट सोमय्यांच्या या दौऱ्याचा विरोध करण्यासाठी सेना-राष्ट्रवादीकडून तयारी करण्यात आली असल्याचं समजतंय. त्यामुळे आता दापोली किंवा रस्त्यात अनेक ठिकाणी संघर्ष निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

“गांधींनी केला तसा आमचा हा सत्याग्रह”
राज्याच्या जनतेसाठीचा हा महात्मा गांधींनी केलेल्या सत्याग्रहासारखाच सत्याग्रह असल्याचं सोमय्यांनी म्हटलं आहे.

मोठा हातोडा घेऊन निघाले सोमय्या
हातामध्ये प्रतिकात्मक स्वरुपाचा मोठा हातोडा घेऊन सोमय्या अनिल परब यांचा रिसॉर्ट पाडण्यासाठी निघाले आहेत.

दापोलीकडे जाण्यासाठी किरीट सोमय्या आपल्या घरापासून कार्यकर्त्यांसह निघाले.
दापोलीकडे जाण्यासाठी किरीट सोमय्या आपल्या घरापासून कार्यकर्त्यांसह निघाले. यावेळी त्यांच्या सोबत अनेक कार्यकर्ते देखील होते.

तब्बल १५० गाड्यांचा ताफा घेऊन दापोलीमध्ये जाणार सोमय्या
तब्बल १५० गाड्यांचा ताफा घेऊन सोमय्या दापोलीमध्ये जाणार असल्याची माहिती भाजप कार्यकर्त्यांकडून मिळतेय. त्यामुळे आता शिवसैनिकांकडून देखील या दौऱ्याला रोखण्याचा प्रयत्न होईल अशी शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *