जयसिंगपुरात ३१ मार्चपासून यड्रावकर चषक राज्यस्तरीय पासिंग व्हॉलिबॉल स्पर्धा

जयसिंगपूर/प्रतिनिधी – रोहित जाधव

(local news) कोल्हापूर जिल्हा व्हॉलिबॉल असोसिएशन व महाराष्ट्र व्हॉलिबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने जयसिंगपूर नगरपालिकेसमोरील विक्रमसिंह क्रिडांगणावर या स्पर्धा होणार आहेत अशी माहिती जयसिंगपूर पासिंग जिल्हा व्हॉलिबॉल क्लबचे अध्यक्ष रोहित नांद्रेकर, यांनी पत्रकार बैठकीत दिली. जयसिंगपूर पासिंग व्हॉलिबॉल क्लबच्यावतीने ३१ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत नामदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर चषक राज्यस्तरीय २१ वर्षाखालील मुले व मुलींच्या पासिंग व्हॉलिबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

२ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा होणार असून, सार्वजनिक आरोग्य व सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याहस्ते स्पर्धेतील विजेत्या संघांना बक्षिस वितरण करण्यात येईल. यावेळी जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर प्रमुख उपस्थित राहणार आहेत.३१ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता महाराष्ट्र व्हॉलिबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्रतिक जयंत पाटील यांच्याहस्ते या राज्यस्तरीय पासिंग व्हॉलिबॉल स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.

यावेळी युवा नेते आदित्य राजेंद्र पाटील यड्रावकर, भारतीय व्हॉलिबॉल फेडरेशनचे सहसचिव बाळासाहेब सूर्यवंशी, महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनचे सचिव विरल शहा प्रमुख उपस्थित राहणार आहेत.या स्पर्धेत कोल्हापूर, पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती, नाशिक, औरगंबाद, लातूर या आठ विभागातील मुले व मुलींचे संघ सहभागी होणार आहेत.

२ स्वतंत्र मैदानावर या स्पर्धा होणार असून, पासिंग व्हॉलिबॉल शौकीनांना बसण्यासाठी गॅलरी उभारण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचे मोलाचे सहकार्य तसेच संघांना अनुक्रमे ११ हजार, ८ हजार, ५ हजार, ३ हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. याचबरोबर मॅन ऑफ टुर्नामेंट, वुमेन ऑफ टुर्नामेंट, बेस्ट अटॅकर, बेस्ट सेटर, बेस्ट लिब्रो अशी बक्षिसेही देण्यात येणार आहेत. (local news)

खेळाडूंच्या राहण्याची व्यवस्था तसेच या स्पर्धा दिवसरात्र होणार आहेत स्पर्धेवेळी इंटरनॅशनल कोच देवीदास जाधव (पुणे), इंडियन रेल्वे कोच वैशाली फडतारे, स्वप्नील पाटील (सातारा) हे उपस्थित राहणार आहेत. जयसिंपुरात प्रथमच राज्यस्तरीय पासिंग व्हॉलिबॉल स्पर्धा होत असून, शौकीनांसाठी ही पर्वणी ठरणार आहे असेही रोहित नांद्रेकर यांनी सांगितले. या पत्रकार बैठकीत माजी नगराध्यक्ष राजेंद्र नांद्रेकर, राजेंद्र झेले, अभिजीत कोंडे.
प्रतिक पाटील, उदय पाटील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *