‘मातोश्री’ गिफ्टप्रकरणी आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण

राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत अनेक राजकीय विषयांवर स्पष्टीकरण दिलं. यावेळी त्यांनी यशवंत जाधव यांच्याकडे सापडलेल्या डायरीमध्येसंबंधीही भाष्य केलं.
स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्याकडे सापडलेल्या डायरीसंबंधी प्रश्न विचारला असता आपण अफवांवर किती विश्वास ठेवायचा हे ठरवलं पाहिजे. यावर अधिकृत माहिती येईल. पण या अफवा पसरवल्या जात आहेत. ज्या-ज्या ठिकाणी अशा यंत्रणा मागे लागल्या आहेत, तिथे त्या लवकरच तोंडावर पडतील असंही वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं.
इतकंच नाहीतर, आघाडी सरकार पाडण्यासाठी हे घाणेरडं राजकारण सुरू आहे. हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासासाठी योग्य नाही. त्यामुळे हे घाणेरडं राजकारण तातडीने थांबलं पाहिजे. नैराश्यातून असे प्रकार होत असतात, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
दरम्यान, काल शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी महाविकास आघाडीतील नाराजी बोलून दाखवली. यावरही आदित्य ठाकरे यांनी आपलं मत मांडलं आहे. महाविकास आघाडीचं सरकार हे विकासासाठी आहे. यामध्ये काही नेत्यांमध्ये थोडी खदखद होते, नाराजी असते. पण त्यांची नाराजी दूर करण्याचं काम इतर नेते करतील. आघाडीतून बाहेर पडण्याबाबतचं तानाजी सावंत यांचं वक्तव्य हे त्यांचं वैयक्तीक मत आहे, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *