पुजारा, रहाणेला काढून टाकण्याबाबत राठोड काय म्हणाले?
भारत आणि दक्षिण आफ्रिका (South Africa vs India) यांच्यातील पहिल्या कसोटीत भारताचे मधळ्या फळीतील फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांना चमकदार कामगिरी करता आली नाही. गेल्या काही सामन्यांपासून रहाणे आणि पुजाराला (Rahane Pujara) मोठी खेळी करण्यात अपयश येत आहे. त्यामुळे त्यांना संघातून वगळण्याची मागणी जोर धरु लागली आहे. मात्र पुजारा आणि रहाणे बाबत टीम इंडियाचे बॅटिंग कोच(Bating Coach) विक्रम राठोड (Vikram Rathour) यांनी वेगळचे मत व्यक्त केले.विक्रम राठोड (Vikram Rathour) यांनी पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी ‘चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे हे आपल्या परीने खूप प्रयत्न करत आहेत. ते त्यांचे सर्वस्व पणाला लावत आहेत. रहाणे (Rahane) हा चांगल्या लयीत दिसत आहे. मात्र दुर्दैवाने तो बाद झाला. हेच पुजाराच्या (Pujara) बाबतीतही घडत आहे.’ असे म्हणत पुजारा आणि रहाणेची (Rahane Pujara) पाठ राखण केली.
ते पुढे म्हणाला की, ‘पुजाराने संघासाठी आधी महत्वपूर्ण खेळी केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेत आव्हानात्मक परिस्थिती असते. इथे फार थोडे लोक धावा करण्यात यशस्वी होतात. ते आपल्या परीने खूप प्रयत्न करत आहेत त्यामुळे आपल्याला थोडा संयम बाळगला पाहिजे. आपल्याला या क्षणाला उतावळेपणा करण्याची गरज नाही.’भारताला पहिली कसोटी (RSAvsIND 1st Test) जिंकण्यासाठी शेवटच्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या सहा विकेट्स घ्यायच्या आहेत. दक्षिण आफ्रिकेने चौथ्या दिवशी भारताचा दुसरा डाव ४०.५ षटकात १७४ धावात गुंडाळला होता. त्यानंतर विजयासाठी ३१५ धावांची गरज असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने चौथ्या दिवस अखेर ९४ धावात आपले चार फलंदाज गमावले होते.
दक्षिण आफ्रिकेला या सामन्यात विजयासाठी पाचव्या दिवशी २२१ धावा करायच्या आहेत. सध्या दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर (Dean Elgar) १२२ चेंडूत नाबाद ५२ धावा करुन एकाकी झुंज देत आहे.