आष्ट्यात नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण
आष्टा – इस्लामपूर रस्त्यावरील येथील पोलिस (police) ठाणे ते महिमान मळा या परिसरात बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास लोकांना गव्याचे दर्शन झाले. यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत आष्टा पोलिसांनी (police) वन विभागाला माहिती दिली आहे.वनपाल सुरेश चरापले व वन विभागाचे कर्मचारी गव्याच्या शोधासाठी आष्ट्याकडे रवाना झाले आहेत. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. तसेच बाहेर पडण्याची गरज पडल्यास सावधानता बाळगावी, असे आवाहन आष्टा पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.