त्वचा ड्राय-रखरखीत झाली, करा हे विंटर स्पेशल क्लिनअप!
इतर कोणत्याही ऋतुमध्ये घ्यावी लागत नाही, एवढी आपल्या त्वचेची (skin) काळजी हिवाळ्यात घ्यावी लागते. बोचरी थंडी, पाणी कमी प्यायल्या गेल्यामुळे त्वचेचं होणारं डिहायड्रेशन असे सगळेच प्रॉब्लेम एकत्र येतात आणि त्वचेचं फार नुकसान होतं. थंडी पडायला लागली की त्वचा देखील खूप काळवंडते. अख्खा हिवाळा (clean up for winter) त्वचेचा हा प्रॉब्लेम सुरू असतो. त्यामुळे मग शेवटी पार्लरला (parlour at home) तरी किती वेळा जायचं असा प्रश्न पडतो.
याशिवाय हिवाळ्यात त्वचाही (skin) खूपच नाजूक झालेली असते. त्यामुळे तिच्यावर उपचारांचा खूप माराही करून चालत नाही. म्हणूनच एरवी आपण जे पदार्थ किंवा कॉस्मेटिक्स सहजपणे चेहऱ्याला लावतो, ते हिवाळ्यात त्वचेला सुट होत नाहीत. म्हणूनच हिवाळ्याच्या दिवसांत अशा खास पद्धतीने तुमच्या त्वचेची काळजी घ्या. हे winter special क्लिनअप आठवड्यातून एकदा करायला काहीच हरकत नाही. शिवाय क्लिनअप करायचं म्हणजे आता अर्धा एक तास द्यावा लागेल असंही नाही. अवघ्या काही मिनिटांत, आपल्या घरात उपलब्ध असणारे साहित्य वापरून झटपट तुम्ही हे winter special क्लिनअप करू शकता. winter special क्लिनअप करण्याची ही पद्धत इन्स्टाग्रामच्या beautyfulyoutips या पेजवर शेअर करण्यात आली आहे.
winter special क्लिनअप करण्याच्या ३ सोप्या स्टेप्स..
3 steps for winter care clean up
१. सगळ्यात आधी तर १ टेबलस्पून साय, १ टेबलस्पून मध आणि १ टेबलस्पून लिंबाचा रस हे सगळं साहित्य एका वाटीत टाका आणि व्यवस्थित एकत्र करून घ्या. या मिश्रणाने चेहऱ्याला २ ते ३ मिनिटे मसाज करा. मसाज हळूवार हाताने आणि गोलाकार पद्धतीने करा. तसेच मसाज करताना तुमची बोटे चेहऱ्यावर खालून वर या दिशेने फिरू द्या.
२. मसाज करून झाल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. मसाज करून झाल्यानंतर चेहऱ्याला वाफ द्या. वाफ जर मशिनने घेणार असाल तर एखादा मिनिटच घ्या. पातेल्यात पाणी तापवून वाफ घेणार असाल तर दोन ते तीन मिनिटे घ्या.
३. मसाज घेऊन झाल्यानंतर चेहऱ्याला फेसपॅक लावायचा आहे. फेसपॅक लावण्यासाठी एका वाटीत दोन टेबलस्पून तांदळाचं पीठ घ्या. त्यामध्ये दोन टेबलस्पून पाणी काढून टाकलेलं घट्ट दही टाका. या मिश्रणाची पेस्ट बनवा आणि ती चेहऱ्यावर लावा. १० मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या आणि त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका. अशा पद्धतीने क्लिनअप केल्यानंतर चेहऱ्याला माॅईश्चरायझर लावायला आणि ओठांना लिपबाम लावायला विसरू नका.