पहिल्याच षटकात बुमराहचा द. आफ्रिकेला दणका, एल्गरा दाखवला पॅव्हेलियनचा रस्ता

 सेंच्युरियन कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताचा पहिला डावात ३२७ धावांवर आटोपला. तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने ५५ धावांमध्ये ७ विकेट गमावल्या. प्रत्युतरादाखल मैदानात उतरलेल्या द. आफ्रिकेच्या डावाची सुरुवात खराब झाली. त्यांनी त्यांच्या डावाच्या पहिल्याच षटकात कर्णधार डीन एल्गरची विकेट गमावली. सध्या द. आफ्रिकेची धावसंख्या ९ षटकांत २ बाद ३० आहे.

मोहम्मद शमीने दक्षिण आफ्रिकेला तिसरा धक्का दिला आहे. त्याने १२ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर आफ्रिकेचा सलामीवीर एडन मार्करामला क्लीन बोल्ड केले.

उपाहारानंतर मोहम्मद शमीने दक्षिण आफ्रिकेला आणखी एक धक्का दिला आहे. त्याने पीटरसनला (१५) क्लीन बोल्ड केले. शमीच्या आत येणा-या चेंडूवर पीटरसनने ड्राईव्ह टाकण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या बॅटच्या आतील भागात जाऊन स्टंपवर आदळला.

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराहने द. आफ्रिकेच्या डावाला सुरुंग लावला. त्याने पहिल्याच षटकाच्या ५ व्या चेंडूवर सलामीवीर डीन एल्गरला पॅव्हेलियनाचा रस्ता दाखवला आणि यजमान संघाला पहिला झटका दिला. यष्टिरक्षक पंतने एल्गरचा झेल पकडला. एल्गर अवघी एक धाव काढली. बुमराहने पहिल्यांदा शॉर्ट बॉलिंग केली आणि नंतर फॉरवर्डला बॉल टाकला, जो एल्गरच्या बॅटच्या बाहेरच्या काठावर आदळला आणि विकेटच्या मागे पंतने त्याचा झेल घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *