नारायण राणे यांना पोलिसांची नोटीस;
नितेश राणे कुठे आहेत हे सांगायला मी मुर्ख माणूस आहे का? आणि तुम्हाला का सांगावे?असे वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सिंधुदुर्ग पोलिसांनी नोटीस बजावली आहे. गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे हे नॉट रिचेबल असून त्यांच्या शोधासाठी तीन पोलिस पथके रवाना केली आहेत.
कणकवली येथे जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या वादातून एका कार्यकर्त्यावर हल्ला केल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर ते गायब आहेत.नारायण राणे हे सिंधुदुर्गात हजर झाल्यानंतर त्यांनी नितेश कुठेच गेलेले नाहीत, असे सांगत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला मात्र, मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी एका पत्रकाराने ‘आमदार नितेश राणे कुठे आहेत?’ असा प्रश्न विचारतला या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी नितेश राणे कुठे आहेत हे सांगायला मी मुर्ख माणूस आहे का? असे वक्तव्य केले. या वक्तव्यावरून राणे यांना सिंधुदुर्ग पोलिसांनी नारायण राणे यांना नोटीस बजावली आहे.सध्या नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू असून, तत्पुर्वीच राणे यांना हजर राहण्याबाबत नोटीस बजावली आहे. दरम्यान माध्यमांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मला माध्यमांशी बोलायचे नाही, असे सांगत त्यांनी माध्यमांना टाळले.
याबाबत गृहराज्यमंत्री शंभूरात देसाई म्हणाले, ‘आरोपीची माहिती घेणं ही कायदेशीर बाब, कामाचा भाग आहे. मंगळवारी पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेले वक्तव्य सर्वांनी ऐकले आहे. सर्वांनी कायद्याला, पोलिसांना सहकार्य करणे गरजेचे आहे. पोलिसांना तपासकामात सहकार्य केले पाहिजे.’