वृश्चिक राशी भविष्य
सातत्याने सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती फलदायी ठरेल. तुम्हाला यश मिळेल. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला तुमची प्रलंबित देणी आणि बिले देण्यास उपयोगी पडतील. आज कामकाज धकाधकीचे, थकविणारे ठरेल – परंतु तुमची मित्रमंडळी सोबत असल्यामुळे तुम्ही आनंदी आणि श्रांत मनोवृत्तीत राहाल. प्रेमप्रकरणाचा दिंडोरा पिटण्याची गरज नाही.
महत्त्वाचे जमीनविषयक व्यवहार आणि करमणुकीच्या प्रकल्पामधील अनेक लोकांचे समन्वयन करण्यास सध्याची स्थिती तुमच्यासाठी उत्तम आहे. जे लोक घरापासून बाहेर राहतात आज ते आपले सर्व काम पूर्ण करून संद्याकाळच्या वेळी कुठल्या पार्क मध्ये एकांत जागेत वेळ घालवणे पसंत करतील. अनपेक्षित पाहुण्यामुळे तुमचे प्लॅन कदाचित बारगळथील, पण तुमचा दिवस निश्चितच चांगला जाईल.