तब्बल 16 दिवस बंद राहणार बँका

बँकशी संबधित तुमचं काही काम असेल तर शक्यतो त्याबाबत नियोजन आखूनच बँकेत जा. कारण पुढील महिन्यात बंपर बँक हॉलि़डे (Bank Holiday) असणार आहेत. तुम्ही योग्य नियोजन न आखता काम पुढे ढकलत राहिलात तर तुमच्या कामाचा खोळंबा होऊ शकतो. हे बँक हॉलिडे प्रत्येक राज्यामध्ये (upcoming bank holidays list) वेगवेगळे असतात. ज्या राज्यात सुट्ट्या निश्चित करण्यात आल्या आहेत त्याठिकाणी बँकांचे कामकाज बंद राहील. त्यामुळे त्यानुसार योजना आखूनच तुम्ही बँकेमध्ये जा.

कोरोना काळात (Coronavirus Pandemic) विविध बँकांनी त्यांच्या अनेक सुविधा ऑनलाइन किंवा डोअरस्टेप देण्यास सुरुवात केली आहे. ग्राहकांनी देखील ऑनलाइन प्रणालीचा वापर त्यांच्या दैनंदिन बँकिंग कामासाठी करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान तरी देखील तुम्हाला काही आवश्यक कामासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता असेल तर बँकाच्या सुट्ट्या (Bank Holiday) तपासूनच बँकेला भेट द्या. अन्यथा तुमच्या कामाचा खोळंबा होऊ शकतो.

जानेवारी 2022 मध्ये आहेत 16 सुट्ट्या

जानेवारी 2022 मध्ये एकूण 16 सुट्ट्या असणार आहेत. यामध्ये सात साप्ताहिक सुट्ट्यांचा देखील समावेश आहे. यापैकी काही सुट्ट्या सलग देखील येतील.

RBI निश्चित करतं सुट्ट्या

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँक सुट्ट्यांची यादी (Bank Holiday List) जारी केली जाते. https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx या वेबसाइटला भेट देऊन तुम्ही सुट्ट्यांची यादी तपासू शकता. प्रत्येत महिन्याची यादी याठिकाणी पाहता येईल.

तपासा जानेवारी 2022 मधील सुट्ट्यांची यादी

1 जानेवारी- शनिवार (देशभर), नववर्षाचा दिवस

2 जानेवारी- रविवार (देशभर), साप्ताहिक सुट्टी

4 जानेवारी- मंगळवार, सिक्कीममध्ये लोसूंग सणाची सुट्टी

8 जानेवारी- दुसरा शनिवार (देशभर), साप्ताहिक सुट्टी

9 जानेवारी- रविवार (देशभर), साप्ताहिक सुट्टी

11 जानेवारी- मंगळवार (मिझोराम), मिशनरी दिवस

12 जानेवारी- बुधवार, स्‍वामी विवेकानंद जयंती

14 जानेवारी- शुक्रवार, अनेक राज्यात मकर संक्रांत/पोंगलनिमित्त सुट्टी

15 जानेवारी- शनिवार, उत्तरायण पुण्यकाल मकर संक्रांत/माघे संक्रांत/संक्रांत/पोंगल/तिरुवल्लुवर दिवस (आंध्र प्रदेश, पुद्दुचेरी, तमिळनाडू)

16 जानेवारी- रविवार, (देशभर), साप्ताहिक सुट्टी

18 जानेवारी- थाई पूसम (चेन्नई)

22 जानेवारी- चौथा शनिवार (देशभर), साप्ताहिक सुट्टी

23 जानेवारी- रविवार (देशभर), साप्ताहिक सुट्टी, नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती

26 जानेवारी- बुधवार (देशभर) प्रजासत्ताक दिन

30 जानेवारी- रविवार

31 जानेवारी- सोमवार आसाममध्ये सुट्टी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *