अश्विनने चेतेश्वर पुजाराला नाचवलं

भारतीय क्रिकेट संघाने सेंच्युरियन कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून इतिहास रचला. यानंतर भारतीय संघाचा विजयोत्सव सर्वत्र साजरा केला जात आहे. हॉटेलमध्ये पोहचताच खुद्द भारतीय संघही आपला विजय साजरा करताना दिसला. भारतीय संघाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने स्वतःच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अश्विनसोबत चेतेश्वर पुजारा आणि मोहम्मद सिराजही डान्स करताना दिसत आहेत. चला तर त्यांच्या मजामस्ती विषयी जाणून घेऊया…. (R Ashभारतीय क्रिकेटपटू त्यांच्या खेळात जसे चमकतात तसेच ते त्यांच्या सोशल मीडिया लाइफमध्ये खूप सक्रिय असतात. खेळाडू त्यांच्या वैयक्तीक आयुष्यातील खास क्षण चाहत्यांशी शेअर करत आनंद द्विगुणीत करतात. अलीकडेच दक्षिण आफ्रिकेतील सेंच्युरियनमध्ये भारतीय संघाने ऐतिहासिक विजय नोंदवला आणि सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करणारा पहिला आशियाई संघ ठरला. या शानदार विजयानंतर भारतीय संघाचे खेळाडू जल्लोषात मग्न झालेले दिसले.

रविचंद्रन अश्विनने मॅचनंतर इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये मोहम्मद सिराज आणि चेतेश्वर पुजाराही त्याच्यासोबत डान्स करताना दिसत आहेत. त्याचा डान्स पाहून तिथे उपस्थित प्रत्येक खेळाडू एन्जॉय करताना दिसत आहेत. अश्विनने व्हिडिओ शेअर करून लिहिले की, ‘पारंपरिक पोस्ट मॅचचे फोटो खूप कंटाळवाणे झाले होते, त्यामुळे चेतेश्वर पुजाराने ते संस्मरणीय बनवण्याचा आणि मोहम्मद सिराजसोबत पहिल्यांदा डान्स करण्याचा निर्णय घेतला. भारतीय खेळाडूंचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून आतापर्यंत साडेसात लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे. भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्यानेही यावर आपली प्रतिक्रिया दिली, तर चेतेश्वर पुजाराची पत्नी पूजा पाबरीही त्याचा डान्स पाहून खूप खुश झालील्याचे दिसत आहे. अश्विनच्या या व्हिडिओवर लाखो यूजर्स त्याचे आणि त्याच्या टीमचे अभिनंदन करत आहेत.सेंच्युरियन कसोटीत भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेचा ११३ धावांनी पराभव केला. दक्षिण आफ्रिकेचा संघ ३०५ धावांचे लक्ष्य गाठताना १९१ धावांतच गारद झाला. या विजयासह भारताने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. मोहम्मद शमीने दोन्ही डावात मिळून ८, तर मोहम्मद सिराजने ३ आणि रविचंद्रन अश्विनने २ बळी घेतले. भारतीय फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर भारताने पहिल्या डावात ३२७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेला १९७ धावाच करता आल्या. यानंतर भारताने दुसऱ्या डावात १७४ धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी ३०५ धावांचे लक्ष्य ठेवले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *