कोरोनाचा फटका, सीरिजमधून दिग्गज खेळाडू घेणार माघार!
(sports news) कोरोना व्हायरसची (Coronavirus) दहशत क्रिकेट विश्वावर 2022 मध्ये देखील कायम आहे. ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये सध्या कोरोना बॉम्ब फुटला आहे. हे. लीगमध्ये तब्बल 16 खेळाडूंची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या भीतीमुळे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) लीगमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना घरी बोलावलं आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या अॅशेस सीरिजमध्ये (Ashes Series) देखील कोरोनाचा शिरकाव झाला आहे. आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड (Australia vs New Zealand) यांच्यात होणाऱ्या वन-डे सीरिजलाही कोरोनाचा फटका बसण्याची चिन्हं आहेत.
न्यूझीलंडची टीम सध्या बांगलादेश विरुद्ध टेस्ट सीरिज खेळत आहे. त्यानंतर त्यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन वन-डे आणि एक टी20 सामना खेळण्यासाठी जायचे आहे. या दौऱ्यानंतर दक्षिण आफ्रिकेची टीम न्यूझीलंडमध्ये येणार आहे. या व्यस्त वेळापत्रकामुळेच न्यूझीलंडच्या प्रमुख खेळाडूंसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. न्यूझीलंडमध्ये विदेशातून येणाऱ्या व्यक्तींसाठी क्वारंटाईनचे नियम कडक आहेत. त्यामुळे त्यांच्या खेळाडूंना ऑस्ट्रेलिया दौरा किंवा दक्षिण आफ्रिका टेस्ट सीरिज यापैकी एकाची निवड करावी लागेल.
न्यूझीलंडमधील ‘स्टफ’ या वेबसाईटनं दिलेल्या वृत्तानुसार न्यूझीलंडमध्ये विदेशातून येणाऱ्या प्रत्येकाला 7 दिवस कठोर क्वारंटाईनमध्ये राहवं लागेल. त्यानंतर कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आला तरच त्यांना क्वारंटाईनमधून बाहेर येण्याची परवानगी आहे. न्यूझीलंडचा ऑस्ट्रेलिया दौरा 8 फेब्रुवारी रोजी संपेल. त्यानंतर 9 फेब्रुवारीला टीम मायदेशी दाखल होईल. दक्षिण आफ्रिका विरुद्धची पहिली टेस्ट 17 फेब्रुवारी रोजी सुरू होणार आहे. त्यामुळे अनेक दिग्गज खेळाडू पहिली टेस्ट खेळू शकणार नाहीत. (sports news)
कोणते खेळाडू घेणार माघार?
न्यूझीलंडच्या टीममधील ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी, टॉम लेथम, हेन्री निकोलस, काईल जेमीसन हे प्रमुख खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघार घेऊ शकतात. हे सर्व जण बांगलादेश विरुद्ध सध्या सुरू असलेल्या टेस्ट सीरिजमध्ये खेळत आहेत. तसेच टेस्ट टीमचे प्रमुख सदस्य आहेत. न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन सध्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर असून तो देखील ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार नाही.