कॅप्टन KL Rahul कडून मोठी चूक, सगळ्यांसमोर मागावी लागली माफी
(sports news) भारतीय संघ यावेळी दक्षिण आफ्रिके विरूद्ध टेस्ट सिरीजच्या दुसऱ्या सामन्याकरता खेळत आहे. या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या ओव्हरमध्ये अतिशय खराब फलंदाजी केली. ज्यामुळे संपूर्ण भारतीय संघ फक्त 202 धावांवर तंबूत परतला.
पहिल्या ओव्हरमध्ये संघाचा कर्णधार केएल राहुलने शानदार हाफ सेंचुरी केली. मात्र या सामन्यात केएल राहुलने अशी मोठी चूक गेली. ज्यामुळे त्याला सगळ्यांसमोर माफी मागावी लागली.
केएल राहुलकडून भयंकर मोठी चूक
पहिल्या दिवशी लंचच्यापूर्वी टीम इंडिया फलंदाजी करत असताना केएल राहुलने मोठी चूक केली. वास्तविक कागिसो रबाडा डावाच्या ५व्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत होता. ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर रबाडाने ऍक्शन घेताच राहुल लगेचच मागे फिरला. राहुल हा चेंडू खेळायला तयार नव्हता असेच दिसत होते. मात्र, राहुलने उशिराने रबाडाला रोखले. त्यानंतर त्याला माफीही मागावी लागली.
अंपायरकडून चेतावणी
राहुलने रबाडाला बॉल फेकण्यापासून रोखले जेव्हा त्याने त्याची अॅक्शन जवळपास घेतली होती. यानंतर केएल राहुलनेही माफी मागितली. पण अंपायरने त्याला जाहीर इशारा दिला.
इशारा देताना पंचाचा आवाजही स्टंप माईकमध्ये कैद झाला होता. अंपायरने केएल राहुलला सांगितले, “प्रयत्न कर पण पुढच्यावेळी थोडं लवकर कर केएल” यानंतर राहुलनेही सॉरी म्हटले. (sports news)
पहिला दिवस आफ्रिकेच्या नावावर
टीम इंडियाला पहिल्या डावात फलंदाजी करता आली नाही.फलंदाजांच्या खराब खेळामुळे पहिल्या दिवसाचा खेळ दक्षिण आफ्रिकेच्या नावावर होता. पहिल्या दिवशी टीम इंडियाच्या 202 धावांच्या प्रत्युत्तरात आफ्रिकन संघाने 1 गडी गमावून 35 धावा केल्या होत्या.
टीम इंडियाचा पहिला डाव अवघ्या 202 धावांवर आटोपला. उत्तर देतान दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्या दिवशी एडेन मार्करामच्या (7) खेळीच्या जोरावर एक विकेट गमावून 35 धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर 11 आणि केगेल पीटरसन 14 धावांवर खेळत आहेत. भारताकडून मोहम्मद शमीने एक विकेट घेतली.