मुंबईत कडक निर्बंध

कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. मुंबईत दररोज कोरोनाबाधितांचा आकडा 20 हजारांवर पोहोचल्यास कडक निर्बंध लागू करण्यात येतील, असा इशारा महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल (Commissioner Iqbal Singh Chahal) यांनी दिला आहे. (Lockdown in Mumbai? Strict Restrictions Commissioner Iqbal Singh Chahal’s warning)
तुर्तास तरी लॉकडाऊन लागू करण्यात येणार नसल्याचे महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, कोविडचे दररोज रुग्ण 20 हजार झाल्यास कठोर निर्बंध लावणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. तर दुसरीकडे वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा पुण्यामध्ये कठोर निर्बंध लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कोरोनाचा धोका वाढल्याने मुंबई पाठोपाठ आता ठाण्यात पहिली ते नववीपर्यंतच्या शाळा (School) 31 जानेवारीपर्यंत बंद राहणार आहेत. राज्यासह मुंबईत कोरोनाच्या (Corona) दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर शाळा बंद करण्यात आल्या आहेत. केवळ दहावी-बारावीचेच वर्ग भरणार आहेत. तसेच उर्वरित राज्यातील शाळा मात्र पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहेत.राज्यातील महाविद्यालयाबाबत आज निर्णय होणार आहे. याबाबत उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्यांनी आढावा बैठक बोलावली. पुढील शैक्षणिक धोरणाबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, कुलगुरुंसह ही बैठक असल्याची माहीती उदय सामंत यांनी ट्विट करुन दिली आहे.

पुण्यातील सार्वजनिक वाहतूक, उद्याने, मॉल आणि शाळांबाबत कठोर निर्बंध लागण्याची शक्यता आहे. आज पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थिती होणाऱ्या आढावा बैठकीत यासंदर्भात चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *