दोन-तीन दिवसांत मुख्यमंत्री कोरोनासंदर्भात बोलतील

राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. संसर्ग वाढत असल्यामुळे तिसऱ्या लाटेचे ढग आणखी गडद होत आहेत. तर संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधक नियम पालू केले आहेत. राज्यात दुसरीकडे मोठ्या घडामोडी घडत आहेत. मुंबई मध्यवर्ती बँकेची निवडणूक पुन्हा एकदा भाजपने जिंकली आहे. तसेच भाजपचे आमदार नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
राज्यातील महाविद्यालयांच्याबाबत थोड्याच वेळात होणार निर्णय
उद्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाची बैठक
ऑनलाइन बैठकीला सुरवात
वाढत्या आपण कोरोना लसीकरणाची मोहीम प्रभावी पद्धतीने राबवत आहोत. खासगी लसीदेखील आपण घेऊन नागरिकांना दिले आहेत. आदित्य़ ठाकरे यांनी केलेले नेतृत्व शेवटी यशस्वी झाले आहे. झोपडपट्टी, चाळ येथे जाऊन युवक, युवती यांची बॅच केली. त्यानंतर आम्ही लसीकरण मोहीम राबवली आहे. आज आयुक्तांनी सांगितलं आहे की वीस हजाराचा आकडा पार झाला की लॉकडाऊन किंवा मिनी लॉकडाऊन करावा लागेल. लॉकडाऊन नको असेल तर गर्दी करणे टाळावे लागेल.कोविड 19 संसर्ग रुग्णसंख्येमुळे शाळेपाठोपाठ महाविद्यालयेदेखील बंद करण्याचा राज्य सरकारचा विचारसध्या रुग्णसंख्या तीन ते चार पटीने वाढत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत ओमिक्रॉनचे टोटोल रुग्ण 157 होते. या संख्येकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. सांगत असलेल्या गोष्टींवर नागरिक प्रयत्नशील आहेत. ते नियम पाळण्याचा प्रयत्न करत आहेत.आपण सर्वांनी काळजी घेतली तर लॉकाडाऊन होणार नाही. पण आपल्याकडे वीस हजार हा कोरोनाबाधितांचा आकडा झाला तर केंद्राने दिलेल्या नियमांची पूर्तता करावी लागेल. त्यामुळे बाजारातील, लग्नातील गर्दी हे टालावे लागेल. कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट आपण थोपवली आहे. त्यामुळे नागरिकांच्या सहकार्याने आपण ही लढाई जिंकू शकतो. येत्या दोन ते तीन दिवसात मुख्यमंत्री कोरोनासंदर्भात जनतेशी बोलतील. महापौर किशोरी पेडणेकर माध्यमांशी बोलत आहेत. आपल्याला लॉकडाऊन नको आहे. लॉकडाऊनमुळे आपले कंबरडे मोडेल. प्रत्येकाने ठरवलं मला लॉकडाऊन नको आहे. मी गर्दीत जाणार नाही. मी मास्क वापरेन, घरच्यांना लस देईल, असं ठरवलं तर लॉकडाऊन लागणार नाही. बसमध्ये बसल्यानंतर मास्क काढणार नाही, हे ठरवावं, असं पेडणेकर म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *