कोरोनो रुग्णसंख्येत आठ पट वाढ होऊनसुद्धा मृत्यूदरात सहापट घट
राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असली, तरी मृत्यूदरही वेगाने घटत असल्याचे चित्र आहे. त्यातही ओमायक्रॉनबाधितांमध्ये मृत्यूचे प्रमाण अत्यंत नगण्य असल्याची बाब पुढे आली आहे. (corona death rate)
राज्यात 21 डिसेंबर ते 4 जानेवारी या कालावधीत 80 हजार 354 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर, 220 रुग्णांचा (0.27 टक्के) मृत्यू झाला. 5 डिसेंबर ते 19 डिसेंबर या पंधरवड्यात राज्यात केवळ 10 हजार 818 रुग्ण आढळून आले, तर 183 रुग्णांचा (1.65 टक्के) (corona death rate)मृत्यू झाला होता.
21 डिसेंबर ते 4 जानेवारी या काळात मागील पंधरवड्यापेक्षा रुग्णसंख्येत आठ पट वाढ होऊनसुद्धा मृत्यूदरात सहापट इतकी घट झाल्याचे आकडेवारी सांगते. मागील पंधरवड्यातील रुग्ण हे ओमायक्रॉनबाधित असल्यानेच मृत्यूदरात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
शासह राज्यात कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली असून, सध्या ती प्राथमिक अवस्थेत (corona death rate) असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ओमायक्रॉन विषाणूची जगभर दिसून आलेली लक्षणे, राज्यात कमी कालावधीत वाढलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा विषाणूच्या तुलनेत पाच ते सहापट अधिक ओमायक्रॉन संसर्ग प्रसाराचा वेग पाहता ही लाट ओमायक्रॉन विषाणूचीच असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.
20 डिसेंबरनंतरचे राज्यातील बहुतांश रुग्ण ओमायक्रॉनबाधित असण्याच्या शक्यतेला राज्याच्या आरोग्य विभागाचे (कोरोना) (corona death rate) तांत्रिक सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी दुजोरा दिला आहे. सध्या मुंबईत समूह संसर्ग झाला आहे.आगामी आठ-दहा दिवसांत पुण्यासह राज्यातील विविध समूह संसर्ग होऊन रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येईल; पण जगभरातील ओमायक्रॉनबाधितांचा मृत्यू दर अल्फा व डेल्टाच्या तुलनेत कमी आहे. राज्यातील घटलेल्या मृत्यूदराबाबतही तोच निष्कर्ष निघतो, असे साळुंखे सांगितले.