शरीराच्या फक्त आकारावरुनच माणसाच्या स्वभावाची ओळख, सामुद्रिक शास्त्राची किमया

प्रत्येकाला आपल्या स्वभावातील किंवा आपल्या सोबतच्या व्यक्तींचे गुण-दोष जाणून घेण्याबद्दल, उत्सुकता असते. सामुद्रिक शास्रानुसार (marine science)किंवा हस्तसामुद्रिक शास्रानुसार म्हणा, कोणत्याही व्यक्तीच्या अवयवांचा आकार बघून त्या व्यक्तीचे गुण-दोष सांगितले जाऊ शकतात. एखाद्या व्यक्तीच्या शरीराचा आकार आणि रंग हा त्यांच्या स्वभावाचा आरसा असतो, असं म्हटलं जातं. प्रत्येक व्यक्तीच्या शरीराचा अर्थात अवयवांचा आकार हा भिन्न असतो. तर व्यक्तींची पारख करण्यासाठी किंवा त्यांचे व्यक्तिमत्त्व ओळखण्यासाठी, सामुद्रिक शास्र काय सांगतं, ते जाणून घेऊया. याबाबत “टीव्ही 9 हिंदी’ने वृत्त दिलं आहे.

नाकाच्या आकारावरून तुमचं व्यक्तिमत्त्व कसं आहे ते कळतं. प्रत्येक व्यक्तीच्या नाकाचा आकार हा वेगळा असतो. कुणाचं नाक लहान, तर कुणाचं जाड असं असतं. पुरुष आणि स्त्रिच्या नाकाच्या आकाराचे परिणाम हे सामुद्रिक शास्रानुसार वेग-वेगळे आहेत. लांब नाक असलेल्या महिला या अगदी राजेशाही जीवन जगतात. तर थोडं वाकडं नाक असलेल्या महिला खूप मेहनती असतात. तसंच उंच नाक असलेल्या व्यक्ती या सदाचारी असतात. तर पोपटासारखं नाक असलेली व्यक्ती आनंदी जीवन जगते. तसंच टोकदार आणि सरळ नाक असलेले लोकदेखील भाग्यवान असतात. लहान नाक असलेले पुरुष हे धार्मिक स्वभावाचे असतात. तर चपटे नाक असलेल्या पुरुषांचा स्वभाव चांगला असतो.

एखाद्या व्यक्तीच्या केवळ डोळ्यांकडे पाहून त्याच्या मनात काय चाललं असंल, याचा अंदाज बांधता येतो. सामुद्रिक शास्रानुसार काळ्या रंगाचे डोळे असणारी व्यक्तीही मेहनती आणि प्रामाणिक असते. त्याच्या बोलण्यातून ठामपणा दिसून येतो. तसंच आपल्या शब्दाला ती पक्की असते. दिलेलं वचन ती पूर्ण करते. तपकिरी रंगाचे डोळे असणाऱ्या व्यक्ती या मानसिकदृष्ट्या मजबूत असतात. तसंच या व्यक्तींकडे लोक आकर्षित होतात. तर ज्या लोकांच्या डोळ्यांचा रंग हा निळा असतो. त्या व्यक्ती खूप भाग्यावान असल्याचं म्हटलं जातं. या व्यक्ती राजेशाही सुख उपभोगतात. तर डोळ्यांचा राखाडी रंग असणाऱ्या लोकाची विश्लेषण करण्याची क्षमता अफाट असते. आपलं म्हणणं ते इतरांसमोर अतिशय चांगल्या पद्धतीने मांडतात.

ओठावर एक आणि आत मनात वेगळंच, असं सहसा म्हटलं जातं. पण ओठाच्या आकारावरून व्यक्ती कशी आहे, हे ओळखता येतं. सामुद्रिक शास्रानुसार (marine science) नुसार, छोटे ओठ असलेल्या व्यक्ती आपल्या मनातील गोष्टी कोणाच्याही समोर विचारपूर्वक सांगतात. तसंच कोणतेही काम घाईगडबडीत करत नाहीत. तर जाडसर ओठ असलेल्या व्यक्ती या निसर्गप्रेमी असतात. त्यांना स्वच्छता आवडते. तसंच मोठे ओठ असलेल्या व्यक्ती हुशार असतात.

इतरांनी आपला मान-सन्मान करावा, अशी त्यांची इच्छा असते. तर लाल ओठ असणारे लोक सुंदर आणि बुद्धिमान तर असतातच शिवाय, या लोकांच्या नशिबी राजयोग असतो. गुलाबी ओठ असलेल्या लोकांचे जीवनदेखील अनेक सुखसोयींनी परिपूर्ण असतं. तसंच काळे ओठ असलेल्या व्यक्ती खूप मेहनती आणि प्रामाणिक असतात. त्यांना आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो. तुम्ही जर या शास्राचा अभ्यास केलात तर तुम्ही समोरची व्यक्ती कशी आहे, याचा अंदाज बांधू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *