सरकारचा मोठा निर्णय
भारतात तिसरी लाट (Third wave in India) आली आहे अशी घोषणा करण्यात आली आहे. त्यात आता राज्यातील बहुतांश मंत्र्यांना आणि आमदारांना कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. राज्यात कोरोना रुग्णांची आकडेवारीही वाढू लागली आहे. त्यामुळे राज्यात आज पुन्हा निर्बंध (Lockdown in Maharashtra) लावण्यात येणार की काय अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर काल राज्यातील सर्व मंत्र्यांची आणि नेत्यांची बैठक पार पडली आहे. या बैठकीत निर्बंध आणि नियमाँवली (Corona guidelines in Maharashtra) संदर्भात महत्त्वाचं निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये राज्यातील 55 वर्षांच्या वरील पोलिसांसाठी (WFH for police in Maharashtra) महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील सर्व वयवर्षे 55 आणि त्याहून अधिक वय (Work from home for police) असलेल्या पोलिसांना आता पुढील काळात वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरून काम करण्याची संधी मिळणार आहे, असे आदेश राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी दिले आहेत.
कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव कमी झाला असताना अचानक राज्यात (Omicron patients in Maharashtra) आणि देशभरात कोरून रुग्णांचे आकडे वाढू लागले आहेत. त्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनं (Third wave in Maharashtra) देशासह राज्यातील काही प्रमुख शहरांमध्ये धडक दिली आहे. यामुळे प्रशंसा आणि यंत्रणा अलर्ट झाली आहे. राज्यात रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी तीन दिवसांवर पोहोचला आहे. म्हणूनच काल मुंबई, पूण्यासह राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या दुपटीनं वाढते आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पन्नास वर्षांच्या वरील व्यक्तींना सर्वाधिक फटका बसला होता. त्यात पोलीस हे अत्यावश्यक सेवेत येत असल्यामुळे अशा पोलिसांना त्रास सहन करावा लागू नये आणि त्यांच्या प्रकृतीसंदर्भात हयगय केली जाऊ नये म्हणून आता राज्यभरातील 55 वर्षांच्या वरील पोलीसानासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
काय म्हणाले दिलीप वळसे पाटील
पोलिसांमधील कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता राज्यात 55 वर्षावरील पोलिस कर्मचार्यांना कमी महत्वाचं काम देण्याचा निर्णय या पूर्वीच घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. कालच राज्यसरकारची मंत्रीमंडळाची बैठक ही नियमांसंदर्भात घेणयात आली होती. यात काही निर्णय घेण्यात आले असून लवकरच ते कळवण्यात येतील.