जयसिंगपूर नगरी साप्ताहिक व न्युज चॅनलच्या 9 व्या वर्धापनदिनी विविध पुरस्कारांचे वितरण
जयसिंगपूर शहरातील नावाजलेले साप्ताहिक व न्युज चॅनल म्हणजे जयसिंगपूर नगरी.जयसिंगपूर नगरी साप्ताहिक व जयसिंगपूर नागरी न्युज चॅनलचा 9 वा वर्धापनदिन 6 जानेवारी या पत्रकार दिनी साजरा करण्यात आला.पत्रकार दिनाचे औचित्य साधून सर्व पत्रकाराना फेटा बांधून फुलांचे झाड व जयसिंगपूर नगरीच्या नावाचे वार्षिक कँलेंडर देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास प्रमुख दत्त सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपत दादा पाटील आणि जयसिंगपूर नगरी चे संपादक महेबुब ऊर्फ राजू सय्यद यांच्या शुभ हस्ते मान्यवरांना पुरस्कार देण्यात आले.
यामध्ये डॉ अतुल प्रकाश घोडके यांना कोरोना (Corona) योध्दा, तर एस एम जगंम यांना आदर्श मुख्याधयापक, सलिम जमादार, निलेश मधाळे,विजय शेटे व कल्पना खुरपे यांना उत्कृष्ट सेवा, तर योगेश गुरव यांना युवा उद्योजक आणि तृप्ती संतोष खामकर यांना समाज भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच अगदी गोड आवाजात सुत्रसंचालक करून प्रेक्षकांना भाराऊन सोडणार्या सौ. रेखाताई गायकवाड यांचा सत्कार सुध्दा उद्यान पंडित गणपत दादा यांनी केला. या सर्वांना प्रमाणपत्र , फुलांचे झाड, जयसिंगपूर नगरीचे कँलेंडर आणि पुरस्कारच्या निमित्ताने छापलेला अंक देऊन गौरवण्यात आले.
यावेळी शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी दतात्रय बोरिगडे, जयसिंगपूर शहरातील नगरसेवक दादा पाटील चिंचवाडकर, राजू झेले, बजरंग खामकर,प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ पाडूरंग खटावकर, डॉ सुनील हाक्के , स्वाभिमानीचे सागर मादनाईक, सर्व पत्रकार बंधू, उदगाव बँकेंचे चेअरमन राजमाने,दैनिक सकाळचे गणेश शिंदे, जयसिंगपूर शहर शिवसेना प्रमुख तेजस कुराडे, संभाजीपूरच्या सदस्या मनिषा पवार, शिवसेना महिला प्रमुख सौ चौगुले, जय हिंद न्यूज चॅनेलचे प्रभाकर माने, एस बी एन चे रतन सिकलगार, एस न्यूजचे संजय सुतार, स्वराज्य क्रांतीचे संस्थापक आदम मुजावर, जिल्हा अध्यक्ष कैलास काळे, उपाध्यक्ष संतोष नलवडे,तालुका अध्यक्ष गजानन पवार व संभाजीपूरचे सामाजिक कार्यकर्ते संभाजी कोळी, आनंदराव खाडे,आजी माजी नगरसेवक, रिपब्लिकन पक्षाचे संजय शिंदे, अब्दुल बागवान, नवाज मुजावर, रोहित जाधव आदी मान्यवरांच्या उपस्थित हा जयसिंगपूर नगरीचा वर्धापन दिवस अगदी दिमाखदार आणि कौतुकास्पद कार्यक्रम सोहळा साजरा करण्यात आला .या सुंदर कार्यकर्माचे आभार स्वराज्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक एजाज मुजावर यांनी आभार मानले.