अमेरिकेत करोना महामारीचा कहर
जगभरात सध्या करोना महामारीचे तिसरी लाट आल्याचे दिसून येत आहे. यामध्ये सर्वाधिक फटका आहे जागतिक महासत्ता म्हणवणाऱ्या अमेरिकेला बसला आहे. कारण, अमेरिकेत दररोज विक्रमी संख्येने नवीन करोनाबाधित रूग्णांची नोंद होत आहे, शिवाय रूग्णांच्या मृत्यू संख्येतही मोठी वाढ झालेली आहे. अन्य देशांच्या तुलनेत अमेरिकेतील करोना संसर्गाची परिस्थिती अतिशय भयावह असल्याचे दिसून येत आहे.
रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे निर्माण झालेल्या करोना व्हायरसच्या नवीन लाटेत अडकलेल्या, अमेरिकेमध्ये मागील २४ तासांमध्ये जागतिक विक्रमी अशी ११ लाख ३० हजार एवढी नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. ही संख्या कोणत्याही देशाने आतापर्यंत एका दिवसात नोंदवलेल्या करोनाबाधितांच्या संख्येपेक्षा कितीतरी जादुसरीकडे, फ्रान्सने एप्रिल २०२१ पासून हॉस्पिटलायझेशन मधील सर्वाधिक नोंद केल्याचेही समोर आले आहे. सोमवारी फ्रान्समध्ये करोनाबाधित असलेल्या आणि रूग्णालयात दाखल लोकाची संख्या ७६७ ने वाढून २२ हजार ७४९ वर पोहोचली.याचबरोबर अतिशय वेगाने पसरणाऱ्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग जगभरात पसरत आहे. यामुळे अनेक देशांना त्यांचे प्रवास नियम कडक करावे लागत आहे. ओमायक्रॉनच्या प्रसारामुळे रुग्णालयातील प्रणालींवर ताण आल्याचेही दिसत आहे.
९ नोव्हेंबर २०२० रोजी, अमेरिकेतील कोविड-19 केसेसच्या संख्येने १० दशलक्षाच टप्पा ओलांडला होता. त्यानंतर २४ मार्च रोजी ३० दशलक्ष, ६ सप्टेबंर रोजी ४० दशलक्ष आणि १३ डिसेंबर रोजी ५० दशलक्षचा टप्पा ओलांडला गेला होता. अशी माहिती वृत्तसंस्थेकडून मिळाली आहे.
एवढच नाही तर अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांना देखील करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. त्यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे. विशेष म्हणजे त्यांचे संपूर्ण लसीकरण होऊन त्यांनी बुस्टर डोस देखील घेतलेला आहे. असे असतानाही त्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. तसेच, सध्या वाढत्या संसर्गामुळे विमानाची उड्डाणे रद्द झाली आहेत, शाळा आणि कार्यालये बंद आहेत, रूग्णालयांवरील भार वाढला आहे.