धरणगुत्ती हायस्कूल धरणगुत्ती मध्ये कोरोना लसीकरण संपन्न
कोरोना ने सर्वत्र धुमाकूळ घातला त्यामुळे शासनाने मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सर्वत्र राबवायला सुरुवात केली, लहानांपासून ते मोठ्या पर्यंत लस घेणे गरजेचे आहे,त्यामुळे विविध ठिकाणी लसीकरण मोहीम राबवली जात आहेत,अगदी शाळे मध्ये सुध्दा आता लसीकरणास सुरुवात झाली आहे,आज शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या धरणगुत्ती हायस्कूल धरणगुत्ती मध्ये कोरोना लसीकरण संपन्न झाले,या हायस्कूल मध्ये ९ वी आणि १० वी या दोन वर्गाचे लसीकरण आज पार पडले,वय वर्षे १५ ते १८ या वयोगटातील मुला मुलींना आज कोरोना लस देण्यात आली, नांदणी आरोग्य केंद्रा मार्फत हे लसीकरण धरणगुत्ती हायस्कूल मध्ये राबवण्यात आले,सुमारे ९९ डोस आज देण्यात आले, विद्यार्थ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला,शाळेतील सर्व शिक्षकांनी उत्तम नियोजन केल्याचे दिसून आले, शासनाने घातलेल्या कोरोना नियमांचे काटेकोर पने पालन करून लसीकरण संपन्न झाले,
यावेळी नांदणी आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी तसेच डॉक्टर वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले, धरणगुत्ती हायस्कूल चे मुख्याध्यापक मुल्लानी सर,माने सर,काळे सर,सतीश माने सर,कांबळे सर,मोरे सर त्याच बरोबर शाळेतील सर्व शिक्षक स्टाप आणि शिपाई वर्ग उपस्थित होते.