‘हे’ न थांबल्यास जिथं असाल तिथं गाठून…
राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress Party) संस्थापक खासदार शरद पवार (Sharad Pawar) हे देशातील थोर नेते आहेत. त्यांच्यावर टीका करण्याएवढी तुमची उंची नसून कर्मवीरांनी स्थापलेल्या रयत शिक्षण संस्थेचा (Rayat Shikshan Sanstha) इतिहास आणि त्यातील पवार कुटुंबीयांच्या योगदानाची माहिती घेण्याचा सल्ला फलटण येथील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुभाष शिंदे (NCP leader Subhash Shinde) यांनी पत्रकाद्वारे आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांना दिला आहे.
याच पत्रकात राष्ट्रवादीतून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेण्यासाठी तुम्ही उतावीळ असायचा. हा उतावीळपणा बघून मीच त्यांची दिल्ली येथे भेट घडवून आणत एक तास चर्चा घडवून आणल्याच्या घटनेची आठवणही त्यांनी आमदार शिंदे यांना करून देण्याचा प्रयत्न केला आहे. रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदाच्या मुद्द्यावरून आमदार शिंदे यांनी खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांना उद्देशून टीका करण्यास सुरुवात केली आहे. या टीकेचा समाचार सुभाष शिंदे यांनी पत्रकाद्वारे घेतला आहे.
कर्मवीर ज्या- ज्यावेळी रयतच्या कामासाठी बारामती येथे जात असत. त्या- त्या वेळी ते शारदाबाई पवार (Shardabai Pawar) यांची भेट घेत असत. त्या वेळी त्यांनी पाच हजारांची मदत कर्मवीरांना केली होती. तेव्हापासून पवार कुटुंबीय (Sharad Pawar) आणि रयतचे संबंध आहेत. रयतच्या घटनेत कुठेही मुख्यमंत्री अध्यक्ष असावा, असा उल्लेख नाही. इतिहासाची, घटनेची माहिती न घेता उचलली जीभ लावली टाळ्याला, अशी कृती तुम्ही करत आहात. त्यांच्याबद्दल अशी वक्तव्ये करणे शोभत नसल्याचे सांगत हे न थांबल्यास जिथे असला तिथे गाठून वेगळ्या पद्धतीने उत्तर मिळेल, असा इशाराही सुभाष शिंदे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.