ऑलिम्पिक पदक विजेत्या धावपटूचे २९ व्या वर्षी अपघातात निधन
लंडन ऑलिम्पिक गेम्समध्ये ४ बाय ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत कांस्य पदक पटकावणाऱ्या त्रिनिदाद आणि टोबागोच्या डेओन लेंडोरचे (Deon Lendore) कार अपघातात (Car Accident) निधन झाले. तो २९ वर्षाचा होता. त्याच्या कारला टेक्सासमध्ये अपघात झाला होता. लेंडोरने तीन ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग घेतला होता. तो २०२० मध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्येही सहभागी झाला होता.टेक्सासच्या सार्वजनिक सुरक्षा विभागाने सांगितेल की लेंडो मिलाम काऊंटी येथे त्याची कार घेऊन चालला होता. त्यावेळी त्याच्या कारला अपघात झाला. टेक्सासच्या डीपीएसने लेंडोरला जागेवरच मृत घोषित केले.लेंडोरने २०१५ च्या जागतिक स्पर्धेत ४ बाय ४०० मीटर स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते. याचबरोबर त्याने इनडोअर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत तीन कांस्य पदके जिंकली होती. लेंडोरच्या अपघाती मृत्यूनंतर ऑलिम्पिक स्पर्धक ग्वेन बेरी (Gwen Berry) यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली. ते लिहितात, ‘मी गेल्या वर्षी एक गोष्ट शिकलो ती म्हणजे जगण्याचे महत्व. तुम्हाला जे वाटते ते करा. तुम्हाला कोणावर प्रेम करायचे आहे त्याच्यावर करा. फक्त जगण्यासाठी मरु नका. जगा आणि मग मरा. यानंतर मी जास्त आनंदी रहायला लागलो.’