पराभवानंतर विराट कोहलीच्या ‘या’ निर्णयावर सुनिल गावस्कर संतापले!
केपटाऊन कसोटीत टीम इंडियाच्या खराब रणनीतीवर महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी टीका केली आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंनी आधीच हार मानल्याचे गावस्कर यांनी म्हटले आहे. तिसर्या आणि शेवटच्या कसोटीत टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेकडून सात गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. यजमानांनी हा सामना जिंकून कसोटी मालिकेवरही कब्जा केला.
केपटाऊन येथील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने द. आफ्रिकेसमोर विजयासाठी २१२ धावांचे लक्ष्य ठेवले होते, मात्र चौथ्या दिवशी टीम इंडिया मैदानात उतरली तेव्हा विजयासाठी ८ विकेट्सची गरज होती. तर यजमान संघाला १११ धावा करायच्या होत्या. भारतीय कर्णधार कोहलीने जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीकडे नवा चेंडू सोपवला. पण या गोलंदाजांना लवकर विकेट घेण्यात यश आले नाही. कीगन पीटरसन दक्षिण आफ्रिकेसाठी संकटमोचक ठरला. आणि त्याने भारताला विजयाची संधीच दिली नाही. पिटरसनने 111 चेंडूत 82 धावा करून आपल्या संघाला विजयीपथावर पोहचवले. काल सामन्याच्या निर्णयाक चौथ्या दिवशी भारताला केवळ एकच विकेट मिळवण्यात यश आले आणि द. आफ्रिकेने 7 विकेट्सनी सामना जिंकून मालिका २-१ ने खिशात टाकली.सामन्याच्या चौथ्या दिवशी कर्णधार कोहलीच्या कोणत्या रणनितीमुळे टीम इंडियाचे गोलंदाज विकेट घेण्यात अपयशी ठरले, याबाबत माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी मोठा खुलासा केला आहे. स्टार स्पोर्ट्सवर बोलताना गावस्कर म्हणाले, शार्दुल ठाकूर आणि बुमराहने दुपारच्या जेवणानंतर गोलंदाजी का केली नाही हे माझ्यासाठी एक कोडचं आहे. ‘हा’ असा निर्णय होता ज्यानंतर विराट कोहली तिसरा कसोटी सामना जिंकणार नसल्याचे सिद्ध झाले. तर, आर अश्विनच्या गोलंदाजीच्या वेळी फील्ड प्लेसमेंट देखील योग्य नव्हती. त्यामुळे द. आफ्रिकेचे फलंदाज एकेरी धाव सहज घेत होते. पाच फिल्डर डीममध्ये होतेसुनील गावस्कर (यांनी द. आफ्रिकेच्या फलंदाजीचे कौतुक केले. यजमान संघाने शक्तिशाली भारतीय गोलंदाजीच्या आक्रमणाविरुद्ध चमकदार फलंदाजी केली. भारतीय वेगवान गोलंदाज बुमराह, शमी, शार्दुल आणि उमेश यांनी फलंदाजांना सतत दबाव ठाकण्याचा प्रयत्न केला. परंतु द. आफ्रिकन फलंदाजांनी आपल्या क्षमतेनुसार खेळ करत आणि हळूहळू लक्ष्य गाठले. जोहान्सबर्गमधील खेळपट्टीही फलंदाजीसाठी प्रतिकुल होती, पण अशा परिस्थितीत द. आफ्रिकेच्या फलंदाजांनी विषेशत: पिटरसन आणि डीन एल्गरने झुंझार प्रदर्शन केले.
तीन सामन्यांत २७६ धावा करणाऱ्या कीगन पीटरसनला प्लेयर ऑफ द सिरीजचा पुरस्कार देण्यात आला. तिसऱ्या कसोटीतील ७२ आणि ८२ धावांच्या खेळीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. आता भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे मालिकेला १९ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.