ICCच्या कसोटी संघातून विराट आऊट रोहित इन

आयसीसी पुरूष कसोटी संघ २०२१ ची (ICC Men Test Team of 2021) घोषणा झाली असून या संघाचे नेतृत्व वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) जिंकणाऱ्या न्यूझीलंडच्या केन विलियमसनकडे सोपवण्यात आले आहे. या संघात दोन आशियाई संघांनी चांगलाच दबबा निर्माण केलाय. या संघात भारताचे (India) आणि पाकिस्तानचे (Pakistan) प्रत्येकी ३ खेळाडू समाविष्ट आहेत. मात्र या संघात भारताचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) जागा मिळालेली नाही.आयसीसी पुरूष कसोटी संघात तीन भारतीय खेळाडूंचा सामावेश करण्यात आला आहे. सलामीवीर म्हणून रोहित शर्मा (Rohit Sharma), विकेटकिपर ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि फिरकीपटू आर. अश्विन (Ravichandran Ashwin) यांचा समावेशी आहे. फलंदाजीत मोठी खेळी करण्यात सातत्याने अपयशी होणाऱ्या विराट कोहलीला या संघात स्थान मिळालेले नाही. (ICC Men Test Team of 2021Rohit Sharma Included Virat Kohli Not Included)या संघात फवाद आलम, हसन अली आणि शाहीन आफ्रिदी या तीन पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश आहे. याचबरोबर न्यूझीलंडच्या केन विलियमसन व्यतिरिक्त कायल जेमिसनही या संघात समाविष्ट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *