स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच राजपथावरील परेडची वेळ बदलणार

देशाचा 73 वा प्रजासत्ताकदिन (73rd Republic Day 2022,) अर्थातच 26 जानेवारी 2022 निमित्त दिल्लीत जोरदार तयारी सुरू झाली आहे. प्रत्येक भारतीय स्वातंत्र्याच्या उत्सवात उत्साह आणि जल्लोषाने सहभागी होत असतो. प्रजासत्ताक दिनी परेड आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी देशातील नागरिक वर्षभर वाट पाहत असतात. मात्र यावर्षी 75 वर्षात (History of indian Republic Day) पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनाची परेड सकाळी 10 वाजता नियोजित वेळेत सुरू होणार नसल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी कोरोना प्रतिबंधात्मक नियम आणि जम्मू-काश्मीरच्या सुरक्षा कर्मचार्‍यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर, परेड सुरू होणार आहे. त्यामुळे 30 मिनिटं उशीरा परेड सुरू होणार आहे.दरवर्षी प्रजासत्ताक दिनाची परेड सकाळी 10 वाजता सुरू व्हायची, पण यंदा ती सकाळी 10.30 वाजता सुरू होईल अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. याचं कारण स्पष्ट करताना अधिकाऱ्याने सांगितलं की, देशातील कोरोनान प्रतिबंधक नियमांमुळे आणि परेड सुरू होण्यापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये प्राण गमावलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना वाहण्यात येत असलेल्या श्रद्धांजलीमुळे 30 मिनिटं उशीरा परेड सुरू होईल. पुढे ते म्हणाले की, ‘परेड गेल्या वर्षीप्रमाणे 90 मिनिटांचीच असेल.दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडिया गेटजवळील राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देतील. नंतर सैन्याचे जवान मार्च पास्ट करतील. सांस्कृतिक विविधता, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीचे प्रतिनिधित्व करणारे देखावे परेड दरम्यान प्रदर्शित केले जातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *