महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे

“महिलांनी आपण जिजाऊच्या लेकी आहोत हे विसरता कामा नये तसेच स्वतःच्या पायावर उभे राहावे,” असे आवाहन जिल्हा परिषदेच्या सदस्या आशा बुचके यांनी टेलरिंग प्रशिक्षणात महिलांना केले.
महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत संतवाडी (ता.जुन्नर) येथील ग्रामपंचायत व रूपश्री महिला विकास संस्था यांच्यावतीने महिला टेलरिंग प्रशिक्षणाचे आयोजन केले होते.
त्याच्या समारोपाप्रसंगी बुचके बोलत होत्या. यावेळी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना प्रशस्तीपत्रकाचे वाटप करण्यात आले.
यावेळी बुचके म्हणाल्या की, महिलांनी टेलरिंग शिकत असताना अतिशय लक्ष देऊन शिक्षण घेतले पाहिजे, कपड्याचे कटिंग, मोजमापे कशी घ्यावीत ही माहिती देत असताना त्या स्वतः देखील एक उत्कृष्ट टेलर असल्याचे सांगितले.
गौरी बेनके म्हणाल्या की, महिलांसाठी या कामांमध्ये मी सदैव तुमच्या बरोबर आहे. टेलरिंगच्यामाध्यमातून महिलांना चांगला रोजगार मिळणार आहे.
कार्यक्रमाचे रामदास शेळके यांनी सूत्रसंचालन तर नवनाथ निमसे यांनी आभार मानले.
याप्रसंगी पंचायत समिती सदस्य जीवन दादा शिंदे, सरपंच नवनाथ निमसे, उपसरपंच स्मिता पाडेकर, सुहास पाडेकर, राजेंद्र पाडेकर,गोरक्ष नवले, संस्थेच्या संस्थापिका अश्विनी नवले आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *