तासाला 400 ऐवजी 800 भाविकांना घेता येणार दर्शन

करवीर निवासिनी अंबाबाई व दख्खनचा राजा जोतिबाच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांच्या (devotees) संख्येत पुन्हा वाढ करण्याचा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने घेतला आहे. तासाला 400 ऐवजी दुप्पट म्हणजेच 800 भाविकांना ई-पासद्वारे दर्शन घेता येणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी मंगळवार दि. 25 जानेवारीपासून करण्यात येणार असल्याची माहिती सचिव शिवराज नाईकवाडे यांनी कळवली आहे.

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेशी मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाने सुरक्षिततेचे निर्बंध कडक केल्यानंतर देवस्थान समितीने अंबाबाई व जोतिबा मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची (devotees) संख्याही कमी करण्याचा निर्णय घेतला. यानुसार तासाला 1000 ऐवजी 400 भाविकांना ई-पासद्वारे दर्शन दिले जात होते. दरम्यान, हिवाळी पर्यटन व प्रजासत्ताक दिनानिमित्त होणारी गर्दी लक्षात घेऊन समितीने भाविकांची दर्शन क्षमता वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. भाविकांनी मास्क, सॅनिटायझर व थर्मल स्क्रिनिंगचा अवलंब करूनच मंदिरात गर्दी न करता दर्शन घ्यावे, असे आवाहन नाईकवाडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *