विराट कोहलीचा अहंकार मोडणार, भारतीय संघात ही गोष्ट पहिल्यांदाच होणार…
(sports news) आतापर्यंत भारतीय संघात जी गोष्ट कधीही पाहायला मिळाली नव्हती, ती आता पाहायला मिळणार आहे. कर्णधारपद गमावल्यावर विराट कोहलीचा अहंकार कायम होता, पण त्याचा हा अहंकार आता मोडणार आहे. कारण रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ही गोष्ट पहिल्यांदाच भारतीय संघात होणार आहे.
रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघात कोणती गोष्ट पहिल्यांदाच होणार, पाहा…
पूर्णवेळ कर्णधार म्हणून रोहित शर्मा वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत पहिल्यांदाच उतरणार आहे. पण या मालिकेत पहिल्यांदाच एक गोष्ट पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर विराट कोहलीचा अहंकारही मोडला जाणार आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतर विराटने संघाचे नेतृत्व सोडले आणि ते रोहित शर्माकडे आले. विश्वचषकानंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये ट्वेन्टी-२० मालिका खेळवण्यात आली. यावेळी भारताचे नेतृत्व रोहितने केले होते आणि संघाने विजयही मिळवला होता. पण विराट या मालिकेत खेळला नव्हता. विराटने या मालिकेसाठी विश्रांती घेतली होती. त्याचबरोबर रोहितच्या नेतृत्वाखाली आता विराट एकदाही खेळलेला नाही.
ट्वेन्टी-२० विश्वचषकातील एका सराव सामन्यासाठी रोहितकडे नेतृत्व देण्यात आले होते. या सामन्यात कोहली खेळणार नसल्याचे ठरले होते. पण या सामन्यात कोहली मैदानात उतरला आणि नेतृत्व करत होता. रोहितचे नेतृत्व त्याला पाहवत नसल्याची टीका त्यावेळी काही चाहत्यांनी केली होती. पण आता त्याच रोहितच्या नेतृत्वाखाली खेळण्याची वेळ कोहलीवर वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत येणार आहे. आतापर्यंत कोहली एकदाही आंतरराष्ट्रीय सामन्यात रोहितच्या नेतृत्वाखाली खेळलेला नाही. भारतीय संघात ही गोष्ट पहिल्यांदाच घडणार आहे. विराटला आतापर्यंत नेतृत्व करण्याची सवय झाली आहे. (sports news)
त्यामुळे रोहित नेतृत्व करत असताना कोहली कर्णधाराच्या आर्विभावात मैदानात वावरताना दिसला तर संघातील वातावरण अजून बिघडू शकते. त्यामुळे आता रोहित नेतृत्व करत असताना कोहली नेमकं काय करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. त्याचबरोबर कर्णधारपद गेल्यानंतर विराटचा आक्रमकपणा तसाच राहतो की त्यामध्ये कोणता बदल होतो, हे पाहणेही चाहत्यांसाठी उत्सुकतेचे असणार आहे.