महाराष्ट्रासह ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढचे २ दिवस धोक्याचे

सततचे हवामानातील बदल काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. गेल्या काही दिवसांपासून देशात काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे तर काही ठिकाणी कडाक्याची थंडी पाहायला मिळते. खरंतर, आणखी काही दिवस हवामानात असेल बदल होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून (Meteorological Department) देण्यात आली आहे. भारताचा बहुतांश भाग सध्या थंडीने गारठला आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा सतत घसरत आहे. अशावेळी भारतीय हवामान विभागाने पुढील पाच दिवस थंडीचा जोर कायम असेल, अशी शक्यता वर्तविली आहे.

पुढील २ दिवसांता गारठा वाढणार

भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, पुढील २ दिवसांत विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि गुजरात राज्यात काही ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागांत आताच पारा घसरून हूडहुडी भरू लागली आहे. मंद वाऱ्यांमुळे थंडी असह्य झाली आहे. अशावेळी हवामान विभागाने (Meteorological Department) दिलेला ताजा अलर्ट महाराष्ट्राच्याही काळजीत भर टाकणारा ठरला आहे.

पुढील ३-४ दिवसांत उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात थंडीची लाट कायम राहील. तर आज, रात्री आणि उद्या सकाळी हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील एकाकी ठिकाणी दाट धुक्याची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर ते कमी होईल.

पंजाब आणि उत्तराखंडच्या काही भागात आज सकाळी दाट धुके पडण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशातही थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे, तर राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशात थंड ते तीव्र थंडीची लाट असेल असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या काही भागात थंडीचे दिवस राहण्याची शक्यता आहे.

‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता

‘स्कायमेट वेदर’ने दिलेल्या माहितीनुसार, अरुणाचल प्रदेशात हलका ते मध्यम पाऊस आणि बर्फवृष्टी होऊ शकते. सिक्कीम आणि ईशान्य भारताच्या इतर भागांमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो तर उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात हलका पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता आहे.

IMD ने फक्त दिल्लीच नाही तर संपूर्ण उत्तर-पश्चिम भारतात थंडीची लाट येण्याचा अंदाज वर्तवला आहे. पुढील दोन दिवसांत उत्तर-पश्चिम भारतातील मैदानी भागात आणि पुढील चार-पाच दिवसांत मध्य प्रदेशात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *