शाळेबाबतच नवे नियम काय?

पुण्यातील शाळा (School) मंगळवार 1 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. तशी घोषणाच उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM ajit pawar)यांनी केली आहे. शाळा सुरू करण्यासाठीची काय नियमावली असेल याची माहिती शाळांना देण्यात येणार आहे. आजच हे आदेश काढण्यात येणार असल्याची माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. इयत्ता पहिली ते 8 वीपर्यंतची शाळा दुपारी 4 पर्यंतच सुरू राहिल. दुपारी विद्यार्थ्यांनी घरी जाऊनच जेवण घ्यावं यासाठी हा निर्णय घेतला आहे. तसेच विद्यार्थ्यांनी मास्क काढूच नये हा सुद्धा त्यामागचा हेतू आहे.

इयत्ता पहिली ते 8 वी हाफ डे आणि नववी ते दहावी पूर्णवेळ शाळा सुरू राहील, असंही ते म्हणाले. तसेच नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचं लसीकरण करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांचं शाळेतच लसीकरण (Vaccination)केलं जाणार आहे. याबाबतची माहिती शाळा चालक आणि संचालकांना देण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. अजित पवार आज पुण्यात होते. पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. गेल्या दोन दिवसांपासून पुण्यातील कोरोना संसर्ग कमी झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

शाळांमध्येच लसीकरण मोहीम राबवणार

नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचं शाळांमध्येच लसीकरण केले जाणार आहे, तसे आदेश संस्था चालकांना देण्यात येणार आहेत. लसीकरण कसे करायचे शाळा चालक आणि संचालकांना आज कळवण्यात येणार आहे. ग्रामीण भागात 86 टक्के 15ते 18 वयोगटातील व्हॅक्सीन झालं. त्या तुलनेत पुणे शहर, पिंपरी चिंचडवडमध्ये लसीकरण कमी झाल्याचे समोर आले आहे.

आठवडाभर हाफ डे

पहिली ते आठवीच्या शाळा (School) आठवडाभर हाफ डे असतील. त्यानंतर आढावा घेऊन पुढचा निर्णय घेऊ. तसेच शाळेत विद्यार्थ्यांना पाठवणं बंधनकारक नाही. ते पालकांवर अवलंबून आहे. आम्ही पालकांना जबरदस्ती करणार नाही, असंही अजित पवारांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *