१ फेब्रुवारीपासून बदलणार ‘हे’ नियम; खिशावर होणार थेट परिणाम

१ फेब्रुवारी २०२२ पासून बँकेशी संबंधित अनेक नियम (rules) बदलणार आहेत. तसेच एलपीजी गॅसच्या किमतीमधील बदलही दर महिन्याच्या १ तारखेला जाहीर केला जातो. दुसरीकडे दरवर्षी १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री संसदेत देशाचा सामान्य अर्थसंकल्प सादर करतात. त्यामुळे १ फेब्रुवारी हा दिवस खूप खास असणार आहे. देशवासियांना आणि उद्योगपतींना यावेळच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पाकडून अनेक आशा आहेत, कारण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यापूर्वी असे संकेत दिले होते की, यावेळी सादर होणारा अर्थसंकल्प आतापर्यंतच्या अर्थसंकल्पापेक्षा वेगळा असणार आहे.

एसबीआय ग्राहकांना झटका देणार

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आता २ लाख ते ५ लाख रुपयांदरम्यान आयएमपीएस (IMPS) व्यवहार करण्यासाठी २० रुपयांसह जीएसटी आकारणार आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये आरबीआयने आयएमपीएस (IMPS) द्वारे व्यवहारांची मर्यादा २ लाख रुपयांवरून ५ लाख रुपये केली.

बँक ऑफ बडोदानेही हे नियम बदलले

१ फेब्रुवारीपासून बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांच्या चेक क्लिअरन्सशी संबंधित नियम (rules) बदलले जातील. आता १ फेब्रुवारीपासून चेक पेमेंटसाठी ग्राहकांना सकारात्मक वेतन प्रणालीचे (पॉझिटिव्ह पे सिस्टिम) पालन करावे लागणार आहे. म्हणजेच चेकशी (धनादेश) संबंधित माहिती पाठवावी लागेल, तरच चेक क्लिअर होईल. हा बदल १० लाख रुपयांवरील चेक क्लिअरन्ससाठी आहे.

एलपीजी सिलेंडरची किंमत

एलपीजी (LPG) सिलेंडरची नवी किंमत दर महिन्याच्या १ तारखेला प्रसिद्ध केली जाते. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये ५ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याने सरकार १ फेब्रुवारी रोजी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ करणार की नाही, हे पाहावे लागेल. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकार एलपीजीच्या किमती वाढवणार नाही, अशी अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *