थंडीत टाचांचं दुखणं जास्तच बळावतं; या 5 गोष्टींनी घरीच करू शकाल इलाज
टाचांचं दुखणं (Heel Pain) ही हल्ली एक सामान्य समस्या बनली आहे. या वेदनेची अनेक कारणं असू शकतात (Cause of Heel Pain). यामध्ये जास्त वेळ उभं राहणं, उंच टाचांच्या चपला वारंवार घालणं, टाचा फुटणं आणि शरीरात कॅल्शियमची कमतरता यासारखी अनेक कारणं असू शकतात. हा त्रास कोणत्याही ऋतूत होत असतो. मात्र, थंडीच्या दिवसात तो अधिकच वाढतो. टाचांचं दुखणं कमी करण्यासाठी वेदनाशामक औषधं घेतली तरी या वेदनांपासून तात्पुरता आराम मिळू शकतो. मात्र घरगुती उपाय चांगलेच फायदेशीर ठरतील.
हिवाळ्यात या पाच गोष्टींची मदत घेतल्यास टाचांच्या दुखण्यापासून बऱ्याच अंशी आराम मिळू शकतो. चला, जाणून घेऊया या 5 गोष्टींबद्दल.
आलं
टाचांच्या दुखण्यावर मात करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात आल्याचा समावेश करू शकता. आल्याचं पाणी दिवसातून दोन-तीन वेळा मधात मिसळून प्यायल्यास टाचांच्या दुखण्यापासून बऱ्यापैकी आराम मिळतो.
हळद
टाचांच्या दुखण्यापासून (Heel Pain) सुटका मिळवण्यासाठी तुम्ही हळदीचा वापर देखील करू शकता. हळद मिसळलेलं पाणी थोड्या मधात मिसळून प्यायल्यास टाचांचं दुखणं कमी होण्यास मदत होते. याशिवाय, तुम्ही हळद दुधात मिसळूनही पिऊ शकता.
मासे
आहारात माशांचा समावेश करून टाचांचं दुखणं आणि सूज कमी करता येते. खरं तर माशांमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड असतं. याच्यामुळं वेदना आणि जळजळ कमी होण्यासोबतच हाडं मजबूत होतात.
अॅपल सायडर व्हिनेगर
टाचांमधील वेदना आणि सूज दूर करण्यासाठी तुम्ही अॅपल सायडर व्हिनेगरदेखील वापरू शकता. यासाठी बादली किंवा टबमध्ये थोडं गरम पाणी घ्या आणि त्यात अॅपल सायडर व्हिनेगरचे काही थेंब मिसळा. त्यानंतर, आपले पाय या पाण्यात काही वेळ बुडवून ठेवा आणि शेकून घ्या.
रॉक मीठ
टाचांच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही आहारात सैंधव मिठाचाही समावेश करू शकता. यासोबतच तुम्हाला हवं असल्यास कोमट पाण्यात सैंधव मिसळून या पाण्यात काही वेळ पाय बुडवून ठेवा. या पाण्यानं तुम्ही तुमचे पाय शेकल्यानं तुम्हाला नक्की आराम मिळेल.