बेडकिहाळ येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचा अवमान : बौद्ध समाजाच्या वतीने संबंधितावर कारवाई करण्यासाठी दिले निवेदन

कर्नाटक/प्रतिनिधी – रोहित जाधव

निपाणी तालुक्यातील बेडकिहाळ येथील समस्त बौद्ध समाज वतीने रायचूर जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश मल्लिकार्जुन गौडा यांनी प्रजासत्ताक दिनी रायचूर जिल्हा न्यायालय परिसरात ध्वजारोहण प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हटविल्या नंतरच ध्वजारोहण करेन असा आग्रह केला

सकाळी समस्त बौद्ध समाज (Buddhist society) बांधव व महिला आंबेडकर चौकात एकत्रित जमून न्यायाधीश मल्लिकार्जुन गौडा यांची प्रेत यात्रा काढली.यावेळी मल्लिकार्जुन गौडा यांच्या वक्तव्याच्या निषेध करत व घोषणा देत दसरा चौक,बाजारपेठ, शिवाजी चौक,जुना बस स्थनाक मार्गे शांतिनगर सर्कल पर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी मानवी साखळी करून तीव्र निषेध व्यक्त केला

.

यावेळी ग्राम पंचायत सदस्य जीवन यादव,तमन्नावर वकील,विद्याधर चितळे, विक्रम शिंगाडे सावित्रीबाई फुले महिला मंडळाचे अध्यक्षा दीपाली जाधव आदींनी निषेधपर मनोगत व्यक्त करून महसूल उपनिरीक्षक संजय नेमन्नावर यांच्या मार्फत राज्यपालाना निवेदन देण्यात आले.यावेळी न्यायाधीश मल्लिकार्जुन गौडा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त केले यावेळी ग्राम पंचायत सदस्य,सदस्या, यांच्या सह बौद्ध समाजातील महिला -पुरुष कार्यकर्ते, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *