भारत-वेस्ट इंडिज सीरिजबद्दल मोठं अपडेट …तर वेळापत्रकात बदल होणार

(sports news) भारत विरूद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातील 3 वन-डे सामन्यांच्या मालिकेला रविवारपासून सुरूवात होत आहे. या मालिकेपूर्वी टीम इंडियावर कोरोना अटॅक झाला आहे. भारतीय टीममधील श्रेयस अय्यर (Shreyas Iyer), शिखर धवन (Shikhar Dhawan), ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि नवदीप सैनी (Navdeep Saini) हे चार खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील 3 सदस्य अशा सात जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे अहमदाबादमध्ये रविवारी होणारा पहिला सामना संकटात सापडला आहे.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं ‘इनसाईड स्पोर्ट्स’ ला या विषयावर दिलेल्या माहितीनुसार, ‘सध्या तरी सीरिज नियोजित वेळापत्रकानुसार होईल. पण, टीम इंडियात आणखी कोरोना केस आढळल्या तर वेळापत्रकात बदल होऊ शकतो. त्या परिस्थितीमध्ये पहिला वन-डे सामना नंतर होईल. आमची त्याबाबत तयारी आहे.’

दरम्यान, कोरोनाचा शिरकाव होताच संपूर्ण टीम सध्या आयसोलेशनमध्ये गेली आहे. ज्या सदस्यांची कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आली आहे, त्यांना हॉटेलमधील दुसऱ्या मजल्यावर शिफ्ट करण्यात आले आहे. तसेच आज (गुरूवार) होणारे प्रॅक्टीस सेशन रद्द करण्यात आले आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार आज सर्व खेळाडूंची पुन्हा एकदा आरटी-पीसीआर टेस्ट होणार आहे. यामध्ये पुन्हा काही जणांना कोरोनाची लागण झाली तर वेळापत्रक बदलण्यात येईल. (sports news)

भारतीय टीम सोमवारी अहमदाबादमध्ये दाखल झाली आहे. प्रॅक्टीस सुरू होण्यापूर्वी 3 दिवस त्यांना क्वारंटाईन राहणे आवश्यक होते. ही मुदत गुरूवारी संपणार होती. त्यानंतर गुरूवारीच त्यांची प्रॅक्टीस सुरू होणार होती. पण, कोरोनामुळे सर्व वेळापत्रक बिघडले आहे.

भारतीय टीममधील ही आणिबाणीची परिस्थिती लक्षात घेता मयांक अग्रवालचा (Mayank Agarwal) टीममध्ये ताततीने समावेश करण्यात आला आहे. शिखर धवन आणि ऋतुराज गायकवाड हे रोहित शर्माचे दोन्ही सलामीचे जोडीदार कोरोना पॉझिटिव्ह आहेत. तर केएल राहुल (KL Rahul) पहिल्या वन-डेसाठी उपलब्ध नाही. त्यामुळे मयांकचा समावेश करण्यात आला आहे. रोहितसह तो पहिल्या वन-डेमध्ये इनिंगची सुरूवात करू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *