सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे दारू पितात;

साताऱ्यात बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या विरोधात ‘दंडवत-दंडुका’ आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना बंडातात्या कराडकर म्हणाले, राज्यातील नेते आणि त्यांची मुले रस्त्यावर दारू पिऊन पडत असतात याचे पुरावे देखील आहेत. सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे दारू पिऊन रस्त्यावर नाचतानाचे फोटो देखील आहेत. फोटो शोधले तर नक्की सापडतील असा त्यांनी खळबळजनक आरोप केला. याच दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ढवळा असून अजित पवार पोवळा असल्याची सडकून टीका यावेळी बंडातात्यांनी केली आहे.

महाराष्ट्र सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा यासाठी व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र यांच्यावतीने साताऱ्यात ‘दंडवत-दंडुका’ आंदोलन करण्यात आले. यावेळी दंडवत दंडुका आंदोलनाला पोलिसानी मज्जाव केल्याने वारकरी आणि पोलिसांच्यात काहीकाळ शाब्दिक चकमक उडाली.
रकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतला असून हा निर्णय दुर्दैवी आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वी तो तातडीने मागे घेण्यात यावा या मागणीसाठी व्यसनमुक्त युवक संघ यांच्यावतीने आणि बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोवईनाका येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असे हातात लाकडी दांडू घेऊन दंडवत-दंडुका आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात वाईन विक्रीचा निर्णय मागे घेण्याची विनंती यावेळी करण्यात आली. तसेच या सरकारने ऐकलं तर ठिक अन्यथा हातात घेतलेला दंडुका सरकारला शुद्धीवर आणण्यासाठी दाखवण्यात येईल असा इशारा यावेळी कार्याध्यक्ष विलासबाबा जवळ यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *