आता RTO मध्ये जाऊन Driving Licence Test देण्याची गरज नाही

केंद्र सरकारने वाहन परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) काढण्याच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. या बदलांमुळे लायसन्स मिळवण्यासाठी यापुढे तुम्हाला आरटीओमध्ये फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. केंद्राने बदल केलेल्या नव्या नियमांनुसार, चालकाला आरटीओ कार्यालयात (RTO Office) जाऊन कोणत्याही प्रकारची ड्रायव्हिंग टेस्ट (No Driving Licence Test) देण्याची गरज नसल्याचे सांगण्यात आले आहे. हे नियम केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अधिसूचित केले असून, हे नियम लागू देखील झाले आहेत
यापुढे ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी आरओटीमध्ये वाहन टेस्टची वाट पाहावी लागणार नसून, तुम्ही कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमध्ये ड्रायव्हिंग लायसन्ससाठी रजिस्ट्रेशन करू शकणार आहात. यासाठी ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमधून प्रशिक्षण घ्यावे लागणार असून, त्याठिकाणी टेस्ट उत्तीर्ण करावी लागणार आहे. टेस्ट उत्तीर्ण झाल्यानंतर अर्जदारांना प्रमाणपत्र देण्यात येणार असून या प्रमाणपत्राच्या आधारे अर्जदाराचे ड्रायव्हिंग लायसन्स जारी केले जाणार आहे. दरम्यान, मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलसाठी सबंधित मंत्रालयाने काही मार्गदर्शक तत्त्वे आणि अटी जाहीर केल्या आहेत.
1. अधिकृत एजन्सी हे सुनिश्चित करेल की दुचाकी, तीन चाकी आणि हलकी मोटार वाहनांसाठी ट्रेनिंग सेंटर्सकडे किमान एक एकर जागा आहे, मध्यम आणि जड प्रवासी मालवाहू वाहने किंवा ट्रेलरसाठी ट्रेनिंग सेंटर्ससाठी दोन एकर जागा आवश्यक आहे.

2. ट्रेनर किमान 12 वी पास असावा आणि त्याला किमान पाच वर्षांचा ड्रायव्हिंगचा अनुभव असावा, त्याला वाहतूक नियमांचे चांगले ज्ञान असावे.

3. मंत्रालयाने एक अध्यापन अभ्यासक्रम देखील विहित केला आहे. हलकी मोटार वाहने चालवण्यासाठी, कोर्सचा कालावधी कमाल 4 आठवडे 29 तासांपर्यंत असेल. या ड्रायव्हिंग सेंटर्सचा अभ्यासक्रम थेअरी आणि प्रॅक्टिकल असा 2 भागांमध्ये विभागला जाईल.

4. लोकांना मूलभूत रस्ते, ग्रामीण रस्ते, महामार्ग, शहरातील रस्ते, रिव्हर्सिंग आणि पार्किंग, चढ-उतार इत्यादींवर गाडी चालवायला शिकण्यासाठी 21 तास घालवावे लागतात. थेअरीचा भाग संपूर्ण अभ्यासक्रमाच्या 8 तासांचा असेल, त्यात रस्ता शिष्टाचार समजून घेणे, वाहतूक शिक्षण, अपघातांची कारणे समजून घेणे, प्रथमोपचार आणि वाहन चालवण्याची इंधन कार्यक्षमता यांचा समावेश असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *